हिवाळ्यात खा डिंकाचे लाडू, ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

हिवाळ्यात खा डिंकाचे लाडू, ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

हिवाळ्यात डिंकाचे लाडू आवर्जुन खाल्ले जातात. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आणि हाडांना बळकटी येण्यासाठी हे लाडू खाल्ले जातात. तसेच या दिवसात शरीरास ऊर्जेची आवश्यकता असते. डिंकाचे लाडू खाल्ल्याने शरीराचे तापमान उबदार राहण्यासही मदत होते. डिंकामध्ये अनेक पोषक तत्व असल्याने त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. नेमके कोणकोणते फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया.

डिंकाच्या लाडूमध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. ते खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यासही मदत होते. शिवाय यात फायबर्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे गॅसचा त्रास कमी होण्यासाठीही हा लाडू फायदेशीर ठरतो.

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि आरोग्य निरोगी राखण्यासाठी डिंकाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

डिंक लाडू खाल्ल्याने शरीराचे तापमान उबदार राहण्यास मदत होते.

थकवा जाणवत असल्यास डिंकाचे लाडू खावेत थकवा नाहीसा होतो.

डिंक लाडू शरीरातील विषारी पदार्थ काढून चयापचय वाढवण्यास मदत करतात.

डिंकाचे लाडू आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही उपयुक्त आहे. ते खाल्ल्याने सुरकुत्या आणि फाइन लाइन कमी होण्यास मदत होते.

हृदयाशी संबंधित समस्यांवरही डिंकाचा लाडू गुणकारी ठरतो. यात गुड फॅट्स असतात. याशिवाय प्रोटीन्स, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाणही जास्त असते त्यामुळे हृदयाच्या विकारांचा धोका कमी होतो.

डिंक लाडू खाल्ल्याने गर्भवती महिलांना ताकदीची गरज असते.

थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात ऊर्जा आणि उष्णता निर्माण करण्याचं काम डिंक करते. शिवाय गर्भवती महिलांना ताकदीची गरज असते त्यामुळे गर्भवती महिलांनाही हे लाडू खायला दिले जातात.

डिंक उष्ण असल्यामुळे विशेषत: थंडीमध्ये याचं सेवन करणे फायदेशीर ठरते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;