नवी मुंबईची अंकिता दहिया ठरली ‘यूएमबी मिस इंडिया-2024′!

नवी मुंबईची अंकिता दहिया ठरली ‘यूएमबी मिस इंडिया-2024′!

यूएमबी ‘मिस इंडिया-2024’ या स्पर्धेत मुंबईची अंकिता दहिया ही अजिंक्य ठरली आहे. अंकिता ही निवृत्त मरिन कमांडो दारासिंग दहिया यांची मुलगी आहे.

ही स्पर्धा दिल्लीमध्ये इंदिरा गांधी स्टेडियमवर दि. 10 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये 65 स्पर्धक सहभागी झाले होते आणि ज्युरी म्हणजे परीक्षकांचे काम माजी मिस वर्ल्ड मनुश्री चिल्लर, सिनेअभिनेता अर्जुन कपूर आणि सिनेअभिनेत्री सारा खान यांनी केले.

अंकिता दहिया हिने सुरुवातीच्या फेऱ्या यशस्वीपणे पार पाडत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत तिला विचारण्यात आले की, ‘तू मिस इंडिया झालीस, तर हिंदुस्थानची कोणती सांस्कृतिक आणि पारंपरिक गोष्ट जगामध्ये पोहोचवशील?’ तिने स्पष्ट केले की, ‘मी शारीरिक तंदुरुस्तीला अत्यंत महत्त्व देणाऱ्या एका कुटुंबाची सदस्य असून, आपली पारंपरिक योगविद्या सर्व जगामध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करेन.

हिंदुस्थानचा सांस्कृतिक वसा आणि वारसा असलेली पुरातन मंदिरे जागतिक स्तरावर पोहोचावीत, यासाठी मनापासून प्रयत्न करेन.’ अंकिता हिचे या उत्तुंग यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन आणि स्वागत होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;