दिल्लीत ईडीच्या पथकावर जीवघेणा हल्ला, एक अधिकारी जखमी

दिल्लीत ईडीच्या पथकावर जीवघेणा हल्ला, एक अधिकारी जखमी

दिल्लीतील बिजवासन परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीत  सायबर क्राईमशी जोडलेल्या घटनेचा तपासादरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात ईडीचे सहायक संचालक जखमी झाले आहेत.

या हल्ल्याची माहिती दिल्ली पोलिसांना देण्यात आली आहे. दिल्लील पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा तपास सुरु केला आहे. या हल्ल्यात ईडीचे एक अधिकारी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनिसार, आज गुरुवारी सकाळी ईडीचे पथक PPPYL Cyber App Fraud case च्या तपासासाठी दिल्लीच्या बिजवासन परिसरात पोहोचली होती. इथे ईडीच्या पथकावर आरोपी अशोक शर्मा आणि त्याच्या कुटुंबियांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात ईडीचे सहायक संचालक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहेत. तर हल्ल्यातील एक आरोपी फरार झाला आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी पोहोचले. तर स्थानिक पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोहोचली आहे. शिवाय सुरक्षेबाबतही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरमध्ये लिहीले आहे की, ज्यावेळी अधिकारी छापेमारी करत होते, त्यावेळी हा हल्ला करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, हल्ल्या दरम्यान खुर्चीही फेकून मारण्यात आली आहे. पोलिसांना घटनास्थळी तुटलेली खुर्ची आढळली. पोलीस सध्या हल्ला कोणी केली याचा शोध घेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;