अमरावतीत रेल्वे ट्रॅक तुटला, ट्रॅकमनच्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळला

अमरावतीत रेल्वे ट्रॅक तुटला, ट्रॅकमनच्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळला

अमरावतीच्या धामणगाव रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे ट्रॅक तुटल्याने मोठी खळबळ उडाली. रुळाच्या जॉईंटमधील वेल्डींग उखळल्याने रेल्वे ट्रॅक तुटला. ट्रॅकमनच्या सतर्कतेमुळे अहमदाबाद-पुरी एक्सप्रेसचा अपघात टळला आहे. ट्रॅकमनने 4 किमी धावत रेल्वे रोखल्याने पुढील अनर्थ टळला. भोलाराम मीना असे ट्रॅकमनचे नाव आहे.

रेल्वे ट्रॅक तुटल्याचे लक्षात येताच ट्रॅकमनने त्या मार्गावर येणारी अहमदाबाद-पुरी एक्सप्रेस 4 किमी धावत जाऊन वेळेत थांबवली. या कामगिरीबाबत ट्रॅकमनवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाला माहिती मिळताच प्रशासकीय पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे ट्रॅक दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;