अंधेरीतील चिनचण इमारतीत आग

अंधेरीतील चिनचण इमारतीत आग

अंधेरी (पश्चिम) येथील वीरा देसाई रोडवरील चिनचण या सात मजली इमारतीच्या  सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने 20 मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीत कुणीही जखमी झाले नाही.

अंधेरी पश्चिम येथील स्टार बाजारजवळील चिंचवण इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील एका घरात सकाळी पावणेनऊच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीच्या घटनेनंतर इमारतीतील रहिवाशांनी इमारतीबाहेर धाव घेतली. अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी पोहचून आग विझवण्याचे काम हाती घेतले. अग्निशमन दलाने 20 मिनिटांत आग आटोक्यात आणली. या आगीत कोणीही जखमी झालेले नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्य़ात आले. ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास अग्निशमन दल, पोलिसांकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;