‘रात्री उशिरापर्यंत मी तिच्यासोबत…’; मलायकासोबतच्या त्या खासगी क्षणांबाबत अर्जुन कपूरचा मोठा खुलासा

‘रात्री उशिरापर्यंत मी तिच्यासोबत…’; मलायकासोबतच्या त्या खासगी क्षणांबाबत अर्जुन कपूरचा मोठा खुलासा

बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल्स आहेत की त्यांची जोडी त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते, अशा जोडप्यांना त्यांचे चाहाते भरभरून प्रेम देतात. आपल्या आवडत्या अभिनेत्याची किंवा अभिनेत्रीची जोडी अशीच कायम राहावी अशी त्यांची इच्छा असते. यातील अनेक जोडपी ही दीर्घकाळ एकत्र राहातात, मात्र काही जोडपी ही वेगवेगळ्या कारणांमुळे एकमेकांपासून विभक्त होतात. अशीच एक जोडी म्हणजे अर्जून कपूर आणि मलायका अरोरा यांची आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये आपण सिंगल असल्याचं वक्तव्य अर्जुन कपूर याने केलं आहे, यावरून आता चर्चेला उधाण आलं आहे. या मुलाखतीमध्ये बोलताना त्यानं मलायका अरोरा आणि त्याच्या खासगी नात्याविषयी देखील अनेक खुलासे केले आहेत.

अर्जुन कपूरचा मोठा खुलासा

अर्जुन कपूरने त्याचा चित्रपट ‘सिंघम अगेन’च्या प्रमोशनवेळी एका मुलाखतीमध्ये बोलताना मोठा खुलासा केला आहे. मी आता सिंगल असल्याचं त्यानं म्हटलं होतं. त्याचं हे वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं. त्यानंतर आणखी एका मुलाखतीमध्ये बोलताना त्यानं मलायका अरोर आणि त्याच्यामधील खासगी क्षणांबाबत देखील अनेक खुलासे केले. त्याने म्हटलं की मी अर्ध्या रात्रीसुद्धा माझ्या गर्लफ्रेन्डला मेसेज करायचो.

मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अर्जुन कपूरला असा प्रश्न विचारण्यात आला होता की तू तुझ्या प्रेयसीला रात्री उशिरापर्यंत मेसेज केले आहेस का? यावर अर्जुन कपूरने हसून उत्तर दिलं की, हो मी माझ्या प्रेयसील मध्यरात्री देखील मेसेज करायचो. त्यानंतर हाच प्रश्न अर्जुन कपूरने तेथे उपस्थित असेलेल्या ऑडियन्सला देखील केला की, कोण आहे असं ज्याने रात्री उशिरा आपल्या प्रेयसीला मेसेज केला नाही, अर्जुनच्या या प्रश्नावर ऑडियन्सने देखील हसून प्रतिक्रिया दिली.

मात्र अर्जुन कपूरने जी मुलाखत दिली त्यातून ही गोष्ट स्पष्ट होऊ शकली नाही की अर्जुन कपूर हा मलायकाला ब्रेकपनंतर देखील मेसेज करत होता, की ब्रेकअप होण्याच्या आधी. याबाबत त्याने कोणताही खुलासा केलेला नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;