किचनचे बजेट कोलमडले, शेवग्याच्या शेंगा थेट 400 रुपये किलो

किचनचे बजेट कोलमडले, शेवग्याच्या शेंगा थेट 400 रुपये किलो

सध्या महागाईमुळे सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. दिवसेंदिवस बाजारातील अन्नधान्य, भाजीपाल्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव देखील गगनाला बिडले आहेत. बाजारातील सर्व भाज्यांचे दर किलोमागे शंभराच्या पुढे गेले आहेत. अशातच घरातील डाळीला अधिक चविष्ट करणाऱ्या तसेच खूप पोषक तत्वे असलेल्या शेवग्याच्या शेंगांचे भाव थेट 400 रुपये किलोवर पोहोचले आहेत.

साधारणत: सर्व घरांमध्ये शेवग्याच्या शेंगांचा वापर होतो. शेवग्यांच्या शेंगांचा रस्सा, सुक्की भाजी, तळलेल्या शेंगा तसेच डाळ किंवा आमटी शेंगा टाकून बनवली जाते. त्यामुळे घरा घरात शेंग आणतातच. त्यात नाक्या नाक्यावर दिसणाऱ्या इडली वडे वाल्यांकडे तर सांबरमध्ये शेंग टाकलीच जाते. त्यामुळे आता गृहिणी तसेच या छोट्या व्यावसायिकांचे देखील बजेट कोलमडणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;