पत्नीशी झालं भांडणं, पतीने अख्ख घर टाकलं जाळून; संपूर्ण घटना जाणून धक्काच बसेल
मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीचे पत्नीसोबत भांडण झालं. यानंतर या व्यक्तीने रागाच्या भरात आपल्याच घराला आग लावली आहे. मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथील आनंद नगरमध्ये ही घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सामानातील आग विझवली. यानंतर पोलिसांनी पती-पत्नीला पोलीसठाण्यात नेले, तेथे या दोघांनाही पोलिसांनी समज दिल्याचं सांगण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, आनंद नगरमध्ये राहणारे श्रीराम कुशवाह यांचा पत्नी रजनी कुशवाहसोबत काही दिवसांपासून वाद सुरू होता. आज पुन्हा पती-पत्नीमध्ये घरात वाद झाला. हा वाद इतका वाढला की, पतीने रागाच्या भरात घरातील सामान बाहेर काढले, त्यानंतर त्यावर रॉकेल ओतून पेटवून दिले. आग लावल्यानंतर नवरा तिथे आरामात फिरत राहिला.
ही आग वाढत गेल्याने आजूबाजूचे लोक त्याच्या घराबाहेर पडले. हे जळतं घर पाहून स्थानिकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती दिली. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असं आधी लोकांना वाटत होतं. मात्र पोलिसांनी पती-पत्नीला आगीचे कारण विचारले असता पतीनेच आग लावल्याचं समजलं.
ग्वालियर वीडियो pic.twitter.com/PQsBEn8zZL
— parmod chaudhary (@parmoddhukiya) November 26, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List