लग्नाचं आमिष दाखवून शारिरीक शोषण केलं, Pushpa -2 सिनेमातील अभिनेत्यावर गंभीर आरोप

लग्नाचं आमिष दाखवून शारिरीक शोषण केलं, Pushpa -2 सिनेमातील अभिनेत्यावर गंभीर आरोप

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनचा बहुप्रतिक्षित चित्रपट पुष्पा- द राइज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या चित्रपटाच्या रिलीज आधीच चित्रपटातील एका अभिनेत्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या चित्रपटातील अल्लू अर्जूनच्या भावाची भूमिका साकारणारा अभिनेता श्रीतेजवर लग्नाचे आमिष दाखवून भावनिक, आर्थिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप आहे. एका महिलेने या अभिनेत्याविरोधात हैदराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पीडित महिलेने 25 नोव्हेंबर, 2024 रोजी कुकटपट्टी पोलीस ठाण्यात अभिनेत्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. श्रीतेजने तिला नातेसंबंधाचे आमिष दाखवले, लग्नाचे आश्वासन दिले आणि 20 लाख रुपयांचे आर्थिक शोषण केले. माझ्यासोबत रिलेशनशिप असूनही अर्चना नावाच्या दुसऱ्या महिलेसोबत त्याचे संबंध होते आणि तिच्यासोबत सात वर्षांचा मुलगाही असल्याचा दावा या पीडित महिलेने केला आहे.

अभिनेत्याविरोधात एप्रिल महिन्यात पहिली तक्रार नोंदविल्याचे या महिलेने सांगितले आहे. परंतु अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी तिला योग्य पावले उचलण्याचे आश्वासन दिल्यानंतर तिने तक्रार मागे घेतली होती. यापूर्वी माधापूर पोलिस ठाण्यात तक्रार देऊनही कारवाई झाली नसल्याचा दावा पीडित महिलेने केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

दरम्यान, पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी श्रीतेज विरुद्ध बीएनएस 69, 115(2), आणि 318(2) सह अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. श्रीतेजला कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश यांची पत्नी अर्चना यांच्यासोबत विवाहबाह्य संबंध ठेवल्याने तो यापूर्वी वादात सापडला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;