इंटीमेट सीन्स करणे सर्वात सोपे, पण लोकं गैरफायदा घेतात; अभिनेत्रीने सांगितला शूटिंगदरम्यानचा किस्सा

इंटीमेट सीन्स करणे सर्वात सोपे, पण लोकं गैरफायदा घेतात; अभिनेत्रीने सांगितला शूटिंगदरम्यानचा किस्सा

अभिनेत्री सयानी गुप्ता आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. तिने अनेक सिरीज, चित्रपटात बोल्ड आणि इंटीमेंट सीन्स दिले आहेत. सयानी सध्या आपल्या एका वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. एका मुलाखतीत तिने इंटीमेसीबाबत खुलासा केला आहे. सिनदरम्यान सहकलाकाराच्या वागणुकीबाबतचा किस्सा तिने शेअर केला आहे.

एका इंटीमेट सीन्सच्या शूटदरम्यान दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही सहकलाकार तिला किस करत राहिला. यामुळे आपल्याला फार अवघडल्यासारखे झाल्याचे सयानीने सांगितले. तसेच इंटीमेन्स सीन्स करताना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो याबाबतही तिने भाष्य केले.

इंटीमेसी कॉर्डिनेटर्सबाबतही सयानीने आपले मत व्यक्त केले आहे. इंटीमेसीवर पुस्तक लिहित असल्याचे सांगत आता हिंदुस्थानात इंटीमेसी कॉर्डिनेटर प्रोफोशन बनल्याबाबत अभिनेत्रीने आनंद व्यक्त केला आहे. इंटीमेट सीन्स करण्यास सोपे असते, कारण ते तांत्रिक असतात. मात्र अनेक लोक याचा गैरफायदा घेतात. असे वागणे अशोभनीय आहे, असे अभिनेत्री म्हणाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;