विवाहित महिलेशी प्रेमसंबंध ठेवणे महागात पडले, शिक्षकाची थेट पोलीस ठाण्यात रवानगी
प्राथमिक शाळेतील शिक्षकाला विवाहित महिलेवर प्रेम करणं चांगलंच महागात पडलं आहे. प्रेयसीला भेटण्यासाठी शिक्षक मध्यरात्री अर्धवट कपड्यात तिच्या घरी दाखल झाला. मात्र प्रेयसीच्या जाऊबाईने त्याला पाहिलं आणि तिने तात्काळ पोलिसांना बोलावलं. याप्रकरणी कोणत्याही पक्षाकडून तक्रार न आल्याने त्याला सोडून देण्यात आलं.
बिलसांडा शहरातील प्राथमिक शाळेच्या एका शिक्षकाचे त्याच शहरातील एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. मंगळवारी रात्री तो प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी अर्धवट कपड्यात दाखल झाला. मात्र प्रेसयीच्या जाऊबाईने दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. यानंतर कुटुंबियांनी शिक्षकाला चोप दिला. मग 112 नंबरवर कॉल करून पोलिसांना बोलावले. पोलिसांनी शिक्षकाला पोलीस ठाण्यात आणले. यानंतर बराच वेळाने पोलिसांनी त्याला घरी सोडून दिले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List