गुजरातच्या गांधीनगरमध्ये जुन्या सचिवालयाच्या इमारतीला आग; संशयाचा धूर पसरला!
गुजरातच्या गांधीनगर येथील जुन्या सचिवालयाच्या इमारतीला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेच जीवितहानी झाली नसली तरी महत्त्वाची कागदपत्रे भस्मसात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीबाबतची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अग्निशमन अधिकारी महेश मोढ यांनी सांगितले की, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अनेक महत्त्वाची कागदपत्रे भस्मसात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
जुन्या सचिवालयाच्या इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी झालो. आगीने रौद्ररुप धारण केल्याने परिसरात धुराचे लोट दिसत होते. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग विझवण्यासाठी कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचा फोडत अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे काम सुरू केले आहे, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचे प्रमाण अद्याप कळू शकलेले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List