दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरात इमारतीला भीषण आग, तीन मजले आगीच्या भक्षस्थानी

दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरात इमारतीला भीषण आग, तीन मजले आगीच्या भक्षस्थानी

दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरात एका निवासी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची माहिती मिळते. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. अग्नीशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळील निशाणपाडा भागात असलेल्या अन्सारी हाइट्स या 15 मजली इमारतीला ही आग लागली. आगीने इमारतीच्या 14 व्या मजल्यासह खाली दोन मजल्यांना वेढले आहे. मुंबई अग्निशमन दलाने ही लेव्हल-1 आगीची घटना म्हणून घोषित केली.

आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र, परिसरातील गजबजलेल्या आणि अरुंद गल्ल्यांमुळे आग विझवण्यात अडथळे निर्माण होत आहेत. आगीत कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;