प्रायव्हेट जेटची मालकीण, राहते 100 कोटींच्या घरात, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीकडे गडगंज संपत्ती

प्रायव्हेट जेटची मालकीण, राहते 100 कोटींच्या घरात, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीकडे गडगंज संपत्ती

कोणत्याही बाहेरच्या अभिनेता, अभिनेत्रीला इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं स्थान भक्कम करणं फार कठीण असतं. स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी सेलिब्रिटींना अनेक संघर्ष करावे लागतात. संघर्ष सुरु असताना काही कलाकार हार मानतात, तर काही सतत स्वतःचे प्रयत्न सुरु ठेवतात. झगमगत्या विश्वात अशीच एक अभिनेत्री आहे, जिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे आणि आता पती आणि जुळ्यामुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

आउटसायडर असताना देखील स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर अभिनेत्रीने भारताची नंबर वन अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली. आज अभिनेत्री कोट्यवधींची माया कमावते. दिल्ली, गुजराय याठिकाणी अभिनेत्रीचं बालपण गेलं. देशात अनेक शहरांमध्ये अभिनेत्री प्रॉपर्टी आहे. 2022 मध्ये अभिनेत्री प्रायव्हेट जेटची मालकीण झालं. तिच्या घराची किंमत जवळपास 100 कोटी रुपये आहे. 40 वर्षांची ही अभिनेत्री गडगंज श्रीमंत आहे.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री नयनतारा आहे. अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत अभिनेत्री ‘जवान’ सिनेमात स्क्रिन शेअर केली आहे. वयाच्या 20 व्या वर्षी नयनतारा हिने करियरला सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by N A Y A N T H A R A (@nayanthara)

नयनताराचा हैदराबादमध्ये आलिशान बंगला आहे. लग्नानंतर अभिनेत्री पतीसोबत चेन्नईतील 4BHK फ्लॅटमध्ये राहते. या घराची किंमत सुमारे 100 कोटी रुपये आहे. नयनतारा एका सिनेमासाठी 12 कोटी रुपये मानधन घेते. एका ब्रँड प्रमोशनसाठी ती 4-7 कोटी रुपये घेते.

नयनतारा हिच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या गाड्या देखील आहे. अभिनेत्रीकडे मर्सिडीज, बीएमडब्ल्यू यांसारख्या महागड्या गाड्या आहेत. अभिनेत्रीकडे स्वतःचं प्रायव्हेट जेट देखील आहे. 2022 मध्ये अभिनेत्रीन 50 कोटी रुपयांमध्ये प्रायव्हेट जेट खरेदी केलं होतं. नयनतारा हिची नेटवर्थ 200 कोटी रुपये आहे. रिपोर्टनुसार अभिनेत्रीच्या नेट वर्थबद्दल सांगायचं झालं तर, तिची नेटवर्थ 22 मिलियन म्हणजे जवळपास 165 कोटी आहे.

नयनतारा हिने जून 2022 मध्ये दिग्दर्शक विघ्नेश शिवनशी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केलं. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ती सरोगसीद्वारे आई देखील झाली. अभिनेत्री जुळ्यामुलांची आई आहे. आज अभिनेत्री तिच्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;