अंकिता लोखंडेचा पहिल्या मासिक पाळीबद्दल मोठा खुलासा; म्हणाली, ‘रक्त पाहून भावाला वाटलं…’

अंकिता लोखंडेचा पहिल्या मासिक पाळीबद्दल मोठा खुलासा; म्हणाली, ‘रक्त पाहून भावाला वाटलं…’

Ankita Lokhande | ‘पवित्र रिश्ता’ मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. छोट्या पडद्यावर स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये देखील अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण अभिनेत्रीला प्रसिद्धी मिळाली नाही. सांगायचं झालं तर, अंकिता तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयष्यामुळे चर्चेत असते. एका मुलाखतीत अंकिता हिने तिच्या पहिल्या मासिक पाळीबद्दल मोठा खुलासा केला. अंकिता हिच्या कपड्यांना लागलेलं रक्त पाहून तिच्या भावाला वाटलं बहिणीचं आता निधन होणार….

मुलाखतीत पहिल्यांदा मासिक पाळी आली तेव्हा माहिती होतं, की शाळेत सांगितलं होतं? असा प्रश्न अंकिता हिला विचारण्यात आला होता. यावर उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, ‘फार जास्त काहीही माहिती नव्हतं, पण आई अनेक गोष्टी सांगायची त्यामुळे अनेक गोष्टी मला माहिती होतं, पण शाळेपेक्षा अधिक गोष्टी मला माझ्या घरुन कळल्या…’

‘मला आठवत आहे माझी पहिली मासिक पाळी आली तेव्हा मी बाथरुममध्ये गेली आणि रक्तस्त्रावर होत होतं. मला फार विचित्र वाटत होतं. कारण तेव्हा मी सहावी किंवा सातवी इयत्तेत असेल… बाथरुममध्ये मी कपडे काढले आणि तिथेच ठेवले. तेव्हा माझा भाऊ (अर्पण) बाथरुममध्ये गेला त्याने माझे कपडे पाहिले, त्याला रक्त दिसलं…’

 

 

‘माझ्या कपड्यांना लागलेलं रक्त पाहिल्यानंतर अर्पण आईला जाऊन म्हणाला, मी आता मिंटीला (अंकिता) कधीच मारणार नाही, कारण तिचं निधन होणार आहे. तेव्हा मला खूप हसायला आलं होतं. कारण तेव्हा त्याला काहीही माहिती नव्हतं. मला देखील फारसं काही माहिती नव्हतं…’

पुढे अंकिता म्हणाली, ‘आमच्या येथे मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आल्यानंतर सेलिब्रेशन होतं. मुलीला नव्या नवरीसारखं सजवून तिला हळद – कुंकू लावलं जातं. माझ्यासाठी देखील असं करण्यात आलं होतं. खूप सारे गिफ्ट मला मिळत होते. पण माझ्यासोबत असं का होत आहे मला काहीही कळत नव्हतं… पण मला नंतर कळलं सर्वकाही चांगलं होतं आहे. मी आता महिला झाली आहे… हे मला तेव्हा समजलं होतं…’ सध्या सर्वत्र अंकिता लोखंडे हिती चर्चा रंगली आहे.

अंकिता लोखंडे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर झगमगत्या विश्वात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेमुळे अंकिता हिच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;