प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकावर कोसळला दुःखाचा डोंगर, कार अपघातात 18 वर्षाच्या मुलाचे दुर्दैवी निधन

प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकावर कोसळला दुःखाचा डोंगर, कार अपघातात 18 वर्षाच्या मुलाचे दुर्दैवी निधन

‘अतिथी तुम कब जाओगे’, ‘सन ऑफ सरदार’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे बॉलिवूड दिग्दर्शक अश्विनी धीर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अश्विन यांचा 18 वर्षांचा मुलगा जलज धिर याचे कार अपघातात निधन झाले आहे. जलज हा त्याच्या अन्य तीन मित्रांसोबत कारमधून प्रवास करत असताना हा अपघात झाला. यात जलजसह त्याच्या एका मित्राचे निधन झाले. पोलिसांनी कारचा चालक आणि जलजचा मित्र साहिल मेंढा याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जलज आणि त्याचे तीन मित्र साहिल, सार्थक आणि जिमी पहाटे 3.30 वाजेपर्यंत त्याच्या घरी व्हिडिओ गेम खेळत होते. त्यानंतर चौघेही वांद्र्यातील सिदगी येथे जेवायला गेले. मग 4.10 च्या सुमारास तेथून निघाले. यावेळी साहिलचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने विलेपार्ले येथील सर्व्हिस रोड आणि पुलाच्या दरम्यान दुभाजकाला धडकली.

यात जलज आणि सार्थक गंभीर जखमी झाले तर जिमी किरकोळ जखमी झाला. जिमीने घटनास्थळी उपस्थित दोघांच्या मदतीने जलजला आधी ट्रॉमा केअर मग कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर साहिलने सार्थकला भाभा रुग्णालयात नेले, तेथे त्यालाही मृत घोषित करण्यात आले आहे. याप्रकरणी जिमीने पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर साहिल मेंढा याला अटक केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;