सूरतमध्ये बसला भीषण अपघात, 15 ते 20 प्रवासी जखमी

सूरतमध्ये बसला भीषण अपघात, 15 ते 20 प्रवासी जखमी

सूरतमध्ये कोसंबाजवळ प्रवासी बसला भीषण अपघात झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नाही. चालकासह 15 ते 20 प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेमुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण होते.

बस चालकाला झोप लागल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडली. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले.

क्रेनच्या सहाय्याने चालकासह सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली. यात जीवितहानी झाली नसली तरी अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. याप्रकरणी अधिकारी घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;