वापरा आणि फेका ही भाजपची भूमिका, मुख्यमंत्री कुणीही बनलं तरी कारभार दिल्लीतूनच चालणार! संजय राऊत यांचा भीमटोला

वापरा आणि फेका ही भाजपची भूमिका, मुख्यमंत्री कुणीही बनलं तरी कारभार दिल्लीतूनच चालणार! संजय राऊत यांचा भीमटोला

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पाशवी बहुमत मिळाले. पाशवी बहुमत देशाला आणि राज्याला हानीकारक आहे. यामुळे हुकुमशाही, मनमानी वाढत जाते. लोकशाहीचा पदोपदी खून होतो, भ्रष्टाचार वाढतो, अदानीसारखी भूतं निर्माण होतात, असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला. ते दिल्लीत माध्यमांशी संवाद साधत होते.

ते पुढे म्हणाले की, कुणाला मुख्यमंत्री करायचे हा भाजपचा प्रश्न आहे. मात्र महाराष्ट्राला नवीन सरकार मिळावे. कारण लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे बहिणी नवीन सरकारची वाट बघताहेत. कर्जमाफीचीही घोषणा करण्यात आली होती, त्याचीही शेतकरी वाट पाहत आहेत. बहिणी, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार सगळेच वाट पाहत असून सरकार ताबडतोब यावे.

अद्याप मुख्यमंत्री कोण होणार हे निश्चित झालेले नाही. दररोज वेगळी बातमी येत आहे. मात्र 26 तारखेला विधानसभेची मुदत संपली आहे. आम्ही सरकार बनवू अशी आशा असताना 26 तारखेपर्यंत सरकार बनले नाही तर राष्ट्रपती शासन लावू अशी भीती दाखवत होते. आताही सरकार बनत नसून महायुतीत गोंधळ असल्याने राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी, अशी मागणी राऊत यांनी केली.

मुख्यमंत्रीपदावरून भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांचे तंगड्यात तंगडे अडकले असून एकमेकांच्या छातीवर बसण्याचा कार्यक्रम सुरू आहे. मुख्यमंत्री कुणीही बनले तरी कारभार दिल्लीतूनच चालणार आहे. त्यामुळे त्या पदावर फक्त कटपुतली बसवायची आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.

संशयास्पद मतदान केंद्रांतील 5 टक्के ‘व्हीव्हीपॅट’ची फेरमोजणी करा! शिवसेना करणार निवडणूक आयोगाकडे तक्रार

आतापर्यंत दिल्लीतील भाजप नेतृत्वाने डोळे वटारले की सगळे गप्प बस होते. पण त्यांनी महाराष्ट्रात जे बंडखोर निर्माण केले ते आता त्यांच्या वटारलेल्या डोळ्यांना पाहून गप्प बसत नाहीत. ते मोदी-शहांना आव्हान देताना दिसताहेत, असेही राऊत म्हणाले. भाजपचा शब्द गांभीर्याने घ्यायचा नसतो. वापरा आणि फेका हीच भाजपची भूमिका असून शब्द फिरवल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण कसे फिरले हे सर्वांना माहिती आहे. फिरवलेल्या शब्दाचा सर्वात मोठा बळी शिवसेना आहे. भाजप कधीच शब्द पाळत नाही. मग तो शब्द खुलेआम दिलेला असो किंवा बंद दाराआड असो, हिंदुहृदयस्रमाट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत दिलेला असो, पंतप्रधानांसमोर दिलेला असो किंवा अमित शहांच्या कार्यालयात दिलेला असो, असेही राऊत म्हणाले.

शब्द पाळणे हे भाजपवर कधीच बंधनकारक नसते. ती नैतिकता ते पाळत आलेले नाहीत. त्यांना एखादा पक्ष फोडण्यासाठी, सरकार पाडण्यासाठी जेव्हा एखाद्याची गरज असते तेव्हा ते आश्वासनांची आणि वचनांची बरसात करतात. त्यांचे काम भागले की लाथा घालतात. हे आता महाराष्ट्रात दिसतेय. शिवसेना-भाजप एकत्र होती तेव्हा हा अनुभव आम्ही घेतलेला आहे, असेही राऊत म्हणाले

राज्यात ‘पुन्हा’ कोण येणार? फडणवीसांच्या नावाची चर्चा, पण मुख्यमंत्री ठरवण्यासाठी भाजप निरीक्षकांची टीम

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;