अंधेरी परिसरात निवासी इमारतीला आग, अग्नीशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल
अंधेरी पश्चमेत वीरा देसाई मार्गावर एका निवासी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
वीरा देसाई मार्गावरील शिंचन इमारीतच्या सहाव्या मजल्यावर आग लागली आहे. इमारतीतील सर्व रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी नाही, मात्र फ्लॅट जळून खाक झाला आहे. आग कशामुळे लागली याबाबत माहिती मिळू शकली नाही. गेल्या अर्ध्या तासापासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List