लष्कराच्या छावणीत काम करणारा बेपत्ता; तणाव वाढला

लष्कराच्या छावणीत काम करणारा बेपत्ता; तणाव वाढला

मणिपूरच्या इंफाळ भागात आज लष्कराच्या छावणीतून लैश्राम कमलबाबू सिंग (55) ही व्यक्ती बेपत्ता झाली. लैश्राम सिंग हे कांगपोकपी येथील लिमाखॉन्ग आर्मी कॅम्प येथे कर्तव्य बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते तेव्हापासून ते बेपत्ता आहेत. मोबाईल बंद आहे. या घटनेनंतर  लैश्राम यांना शोधण्यासाठी निघालेल्या ग्रामस्थांना लष्कराने रोखले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सरकारविरोधात रास्ता रोको केला.

11 नोव्हेंबर रोजी कुकी दहशतवाद्यांनी जिरीबाम येथून सहा मैतेईंचे अपहरण करून त्यांची हत्या केली. त्यांचे मृतदेह नदीत सापडले. तेव्हापासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. आता आणखी एक व्यक्ती बेपत्ता झाल्याने मणिपूरमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, सहा मैतेईंचे मृतदेह सापडल्यानंतर आक्रमक झालेल्या जमावाने 10 हून अधिक भाजपा आमदारांची घरे पेटवून दिली होती. मोठय़ा प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान केले होते. याप्रकरणी ‘एनआयए’ अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने तीन गुन्हे दाखल केले आहेत.

संचारबंदीमुळे मणिपूरमध्ये शाळा आणि महाविद्यालये अनिश्चित काळासाठी बंद राहातील, अशी घोषणा आज सरकारने केली. इंफाळ पूर्व आणि पश्चिम, बिष्णुपुर, थौबल, काकचींग आणि जिरीबाम येथे बुधवारपासून सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यातयेणार आहेत. 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;