खोकल्याचे औषध समजून चिमुकल्यांना सॅनिटायझर पाजले

खोकल्याचे औषध समजून चिमुकल्यांना सॅनिटायझर पाजले

खोकल्याचे औषध समजून पाच वर्षाच्या चिमुकल्यांना शिक्षिकेने चक्क सॅनिटायझर पाजल्याचा प्रकार इन्सुलीतील एका अंगणवाडीत घडला आहे. ती दोन्ही मुले अस्वस्थ झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ही घटना आज एक वाजण्याच्या सुमारास घडली. तत्पूर्वी त्यांना परिसरातील बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु तिथून त्यांना सावंतवाडीतील उपजिल्हा रुग्णालय नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्या दोघांना गेले काही दिवस सर्दी खोकल्याचा त्रास होता. त्यामुळे तेथे असलेल्या खोकल्याचे औषध समजून सॅनिटायझर पाजले. काही वेळाने ती मुले अस्वस्थ झाली. त्यामुळे त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर पालकांना सोबत घेऊन त्यांनी त्या दोन्ही मुलांना बांदा प्राथमिक आरोग्य पेंद्रात दाखल केले. परंतु त्या ठिकाणी उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला देण्यात आल. त्यानुसार त्यांच्यावर सावंतवाडीत उपचार सुरू आहेत. याबाबत बांदा येथील पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पालकांकडून देण्यात आली. झालेल्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच त्याची नोंद प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;