“ज्यादा नाटक करोगे तो…” विचित्र वक्तव्य, व्हिडीओ; राखी सावंत ‘अशा’ विक्षिप्त कमेंट्समुळे ट्रोल झाली

“ज्यादा नाटक करोगे तो…” विचित्र वक्तव्य, व्हिडीओ; राखी सावंत ‘अशा’ विक्षिप्त कमेंट्समुळे ट्रोल झाली

राखी सावंतने अगदी दणक्यात दुबईत तिचा वाढदिवस साजरा केला आहे. तिच्या जवळच्या मित्रांनी, चाहत्यांनी, अनेक कलाकारांनी तिच्या बर्थडे पार्टीला हजेरी लावली होती. राखी सावंतचे बॉलीवूडमध्ये स्वत:चे असे वेगळे स्थान आहे. तिच्या डान्स आणि तिच्या मनोरंजन करण्याची जी स्टाईल आहे त्याचे सगळेच दिवाने आहेत. राखी म्हणजे फक्त एंटरटेंनमेंट एंटरटेंनमेंट असते. पण तिच्या स्पष्ट बोलण्याने किंवा काही विचित्र कमेंटमुळे ती कायमच चर्चेत असते.

त्यात तिच्या लग्नाच्या चर्चा तर नेहमीच होत असतात. आदिल खानमुळे तर नेहमीच चर्चा होत असते. राखी देखील कोणत्या ना कोणत्या विषयामध्ये आदिलबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतच असते. आता तिच्या अशाच एका वक्तव्यामुळे ती ट्रोल झाली आहे. राखी म्हटलं की कॉन्ट्रोवर्सी तर असणारचं. तर पाहुयात ही ड्रामा क्वीन तिच्या कोणत्या वक्तव्यांनी ट्रोल झाली होती.

विक्षिप्त कमेंट्समुळे ट्रोल झाली राखी

राखीला एकदा पापाराझींनी एक प्रश्न विचारला होता तेव्हा राखीने उत्तर दिलं होतं की, ‘राखी सावंत तर एकच आहे. राखी सावंत ओरिजनल आहे, बाकी लोक तिची कॉपी करू शकतात. त्यांना ते करू दे. त्यांचं घर चालेल. पण पुढच्या सात जन्मांमध्ये कोणीही राखी सावंत बनू शकत नाही असं म्हटल्यानं राखी ट्रोल झाली होती.

एकदा ती आदिलबद्दल म्हणाली होती की, ‘माझ्या एक्सला फक्त बदला घ्यायचा आहे. आणि मला तुरुंगात पाठवायचे आहे. पण माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. जीती जागती भिखारन हो गई हूं’ हे तिचं वक्तव्य चांगलंच गाजलं.होतं. खरंतर राखीचे आदीलसोबतचे लग्न आणि नंतर त्यांचा घटस्फोट, त्यांचे आरोप-प्रत्यारोप या गोष्टी बऱ्याच काळ चर्चेचा विषय राहिला आहे. त्यावेळी राखीने बऱेच मोठे आणि गंभीर आरोप आदिलवर केले होते.

तसेच याच काळात राखीने आदिवर तिचा फोन हॅक करण्यापासून ते स्वत:चे न्यूड व्हिडीओ लीक केल्याचाही आरोप केला होता. तसेच तिचे सगळे पैसे तो घेऊन गेला. अन् त्याने तिचीच बदनामी केल्याचंही राखीने सांगितले होते.

एकदा सानियाबद्दल बोलल्याने ती ट्रोल झाली होती.”मी स्वतः खुदाने दिलेलं एक गिफ्ट आहे. पण हिंदुस्तानसाठी नाही..ज्यादा नाटक करोगे तो पाकिस्तान जाऊंगी..आपली सानिया मिर्झा गेली. मी लोखंडवालाची राणी आहे” या वक्तव्यावरून राखी ट्रोल झाली होती.

एकदा तर राखीने ती आई होऊ शकत नाही असा अचानक खुलासा केल्यानं तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. तिच्या पोटात दहा सेंटीमीटरचा ट्यूमर सापडला. सर्जरी करून डॉक्टरांना पूर्ण गर्भाशय काढावं लागलं आणि यामुळेच ती आई होऊ शकणार नाही. असा खुलासा राखीनं केला होता. तसं पाहायला गेलं तर राखी नेहमीच अशा काही बातम्या मीडियासमोर आणते की ते ऐकून सुरुवातीला सर्वांनाच धक्का बसतो.

पण या सर्व ट्रोलिंगमुळे किंवा लोकं तिच्याबद्दल काय म्हणतात याबद्दल तिला कधीच काही फरक पडला नाही. तिने नाही यावर कधी प्रतिक्रिया दिली. म्हणूनच ती कितीही ट्रोल झाली तरी चाहते मात्र आजही तिला तेवढच प्रेम देतात. फक्त राखी म्हणजे नेहमीच एंटरटेंनमेंट एंटरटेंनमेंटच राहणार यात शंका नाही.

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;