अशा प्रकारच्या निवडणूका पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये सुद्धा होत नसतील, संजय राऊत यांचा घणाघात

अशा प्रकारच्या निवडणूका पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये सुद्धा होत नसतील, संजय राऊत यांचा घणाघात

महाराष्ट्रात नुकताच विधानसभा निवडणूकीचा निकाल लागला आहे. ईव्हीएमने दिलेल्या निकालानुसार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी आता ईव्हीएममधील घोटाळे समोर येत आहेत, अनेक उमेदवारांनी देखील ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे.

याच दरम्यान परळी मतदारसंघातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत अजित पवार गटाचे धनंजय मुंडे यांचे समर्थक मतदारांना मारहाण करून हाकलून देत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी हा व्हिडीओ X या समाजमाध्यमावर शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी एक पोस्ट शेअर करत निवडणूक आयोगाला फटकारले. ”लोकशाहीतील विचलित करणारे हे दृश्य आहे परळी मतदार संघातील. अशा प्रकारच्या निवडणुका पाकिस्तान अफगाणिस्तान मध्ये सुद्धा होत नसतील. मतदाराना केंद्रावर येऊच दिले नाही. दहशत माजवून पळवून लावले. निवडणूक आयोग जिवंत आहे काय?”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;