आसामच्या व्लॉगर तरुणीचा मित्राने केला घात, संशयित दोन दिवस राहिला मृतदेहासोबत!

आसामच्या व्लॉगर तरुणीचा मित्राने केला घात, संशयित दोन दिवस राहिला मृतदेहासोबत!

बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माया गोगोई नामक व्लॉगर तरुणीचा इंदिरा नगर परिसरात असलेल्या सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये खून करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी दोन दिवस मृतदेहासोबत राहिल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 23 नोव्हेंबर रोजी आरव हरणी आणि पीडित तरूणी इंदिरा नगर सोसायटीमधील सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये आले होते. त्याच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 नोव्हेंबरला पीडित तरूणीचा खून करण्यात आला. पीडित तरुणीला चाकूने अनेक वेळा भोसकण्यात आले आहे. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर दोन दिवस आरोपी मृतदेहासोबत होता, असा पोलिसांना संशय आहे. त्यानंतर तो फरार झाला आहे. माया गोगोई ही मुळ आसामची असून ती एक व्लॉगर आहे. तसेच आरोपी आरव हा केरळचा रहिवाशी आहे. ते दोघ मित्र असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे. India Today या इंग्रजी वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;