तुझा देवावर विश्वास आहे का? प्राजक्ता माळीच्या उत्तराचे काही चाहत्यांकडून कौतुक अन् काहींकडून प्रश्नचिन्ह उपस्थित

तुझा देवावर विश्वास आहे का? प्राजक्ता माळीच्या उत्तराचे काही चाहत्यांकडून कौतुक अन् काहींकडून प्रश्नचिन्ह उपस्थित

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी फुलवंती चित्रपटामुळे चांगलीच प्रसिद्धी झोतात आली आहे. चित्रपटातील तिची भूमिका आणि तिचे नृत्य याला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. तसेच फुलवंती हा चित्रपट OOT वरही आला असून सर्वाधिक रॅंक या चित्रपटाला मिळाले आहेत. या चित्रपटाने हॉलिवूडच्या चित्रपटांनाही मागे टाकल्याचे चित्र OOT वर पाहायला मिळाले.

चाहत्यांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तिने एका व्हिडीओद्वारे त्यांचे आभार मानले. तिने हा व्हिडीओ मुंबईत नाही तर बँगलोर येऊन पाठवला होता. प्राजक्ता आता मुंबईत नाही तर बँगलोर येथील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या आश्रमात आहे. तिथून ती अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत आहे.

प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अजून एक व्हिडीओ शेअर केला आहे “महाराष्ट्रावर आणि कलेवर इतकं प्रेम नसतं तर या घडीला मी बँगलोर आश्रमात आश्रमवासी असते. होय होय…इथे राहणं, ध्यान करणं इतकं आवडतं. आश्रमवासी नाही होऊ शकले तरी निदान १५-२० दिवस इथे सेवा करायला नक्कीच येईन. आणि सातत्याने इथे येत राहीन,” असं कॅप्शन प्राजक्ताने या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओत ती आश्रमात काय करतेय, कोणत्या गोष्टी शिकतेय याबाबत तिने सांगितलं.

प्राजक्ताच्या याच व्हिडीओवर अनेकांनी तिला प्रतिक्रिया देत तिचं कौतुक केलं,तर एका चाहत्याने तिला थेट देवाबद्दलच प्रश्न विचारला. त्यावर प्राजक्ताने एका शब्दात त्याला उत्तरही दिलं आहे. तिला एका चाहत्याने देवासंदर्भात प्रश्न विचारला की, ‘तुझा देवावर विश्वास आहे का?’ त्यावर प्राजक्ताने ‘होय’ असं एका शब्दात त्याला उत्तर दिलं आहे. तसेच इतर चाहत्यांनी देखील या आश्रमातील त्यांचे काही अनुभव शेअर केले आहे.

दरम्यान प्राजक्ताच्या या उत्तरानंतर अनेकांनी तिच कौतुक केलं पण अनेकांनी तिच्या या उत्तरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. एका चाहत्याने लिहिलं आहे की “ती ओशोंची फॅन आहे मग ती देवाल कसं मानू शकते.” असे अनेक चाहत्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर मात्र प्राजक्ताने काही प्रतिसाद दिला नाहीये.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)


दरम्यान प्राजक्ताच्या ‘फुलवंती’ला आणि सोबतच प्राजक्ताला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळालं आहे. तिच्याबरोबर गश्मीर महाजनी यांच्या भूमिकेला आणि अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले आहे. आता प्राजक्ता यानंतर पुन्हा एकदा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या आगामी पर्वात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;