…म्हणून वेडिंग गाऊनला कात्री लावली, समांथाने सांगितले कारण

…म्हणून वेडिंग गाऊनला कात्री लावली,  समांथाने सांगितले कारण

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चेत असते. समांथा आणि तेलगू सुपरस्टार नागा चैतन्य लग्नानंतर अवघ्या चार वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर समांथा मानसिक तणावाखाली होती. नुकत्याच एका मुलाखतीत समांथाने काही महिन्यांपूर्वी तिच्या लग्नातला गाऊनला कात्री लावली होती. नागा चैतन्यसोबत ख्रिश्चन पदधतीच्या लग्नात तिने हा गाऊन घातला होता. गाऊनला कात्री लावण्याचते कारणही तिने यावेळी सांगितले.

गलाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत समांथाने सांगितले की, नागा चैतन्य़सोबत घस्फोट घेतल्यानंतर तिच्यावर अनेक बाजूने खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. वाटेल तसे आरोप करण्यात आले. अनेक वाईट कमेण्ट्स करण्यात आल्या. अशावेळी आपल्यामध्ये नकारात्मकता वाढते आणि काहीच आपल्याविषयी कोणतीच चांगली गोष्ट वाटत नाहीय अशा भावना व्यक्त केल्या.

नागा चैतन्यशी ख्रिश्चन पद्धतीने विवाह केल्यानंतर लग्नात घातलेल्या गाऊनला कात्री का लावली असे विचारले असता ती म्हणते, लग्नाच्या ड्रेसला कात्री लावण्यामागे कोणतीही सूड भावना नव्हती. गाऊनला कात्री लावून नवा ड्रेस बनवल्याचं तिने सांगितले होते. नागा चैतन्यसोबत ख्रीश्चन पदधतीच्या लग्नात तिनं हा गाऊन घातला होता. यात काही मोठी गोष्ट नसल्याचेही ती यावेळी म्हणाली. जे व्हायचे ते होऊन गेले. मी ते लपवण्याचा प्रयत्न करत नाही. पण आता मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे.अनेक सकारात्मक बदल माझ्यात झाले आहेत.नवीन प्रोजेक्ट्स करत असल्याचेही ती यावेळी मुलाखतीत म्हणाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;