प्रतिष्ठित कुटुंबातील मुली असं करत नाही…, जेव्हा मनिषा कोईरालाने अनेक संकटांचा केला सामना

प्रतिष्ठित कुटुंबातील मुली असं करत नाही…, जेव्हा मनिषा कोईरालाने अनेक संकटांचा केला सामना

Manisha Koirala: अभिनेत्री मनिषा कोईराला हिने एकेकाळी एकापेक्षा एक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला. अभिनेत्रीने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सिनेमा निर्माते विक्रमादित्य मोटवानी यांच्यासोबत अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. त्यांनी सांगितलं की, सुरुवातीला अनेकांनी ‘हीरामंडी’ वेब सीरिजमध्ये काम करण्यास नकार दिला होता. एवढंच नाही तर जेव्हा अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा विचार केला होता तेव्हाही लोकांनी तिच्या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

मनिषा कोईराला म्हणाली, ‘जेव्हा जवळपास 30 वर्षांपूर्वी मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं. आपल्या सर्वांना माहिती आहे की तेव्हा काळ फार वेगळा होता… माझ्या निर्णयावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. प्रतिष्ठित कुटुंबातील मुली सिनेमात काम करत नाही… मुलींनी अभिनेत्री होऊ नये… असं सतत सांगितलं जायचं…’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Manisha Koirala (@m_koirala)

 

‘मला पहिल्या सिनेमातून यश मिळाल्यानंतर सर्वांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला… माझ्यावर टीका करणाऱ्यांना माझ्यावर गर्व वाटू लागला…’ पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘एक वेब सीरिज करताना देखील मला अनेक नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागला…’

‘हीरामंडी प्रोजेक्टबद्दल मला कधीच शंका नव्हती. मी सुरुवातीपासून कथेत गुंतली होती. वेब सीरिज करण्याबाबत मला सुरुवातीपासूनच विश्वास होता, फक्त ती संजय लीला भन्साळी होती म्हणून नाही. परंतु या वस्तुस्थितीमुळे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर एक संपूर्ण गेम चेंजर होणार होता…’ असं देखील अभिनेत्री मनिषा कोईराला म्हणाली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Manisha Koirala (@m_koirala)

 

सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून मनिषा बॉलिवूडपासून दूर आहे. पण ‘हीरामंडी’ सीरिजमुळे मनिषा हिला पुन्हा स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली. ‘हीरामंडी’ सीरिजमध्ये मनिषा हिने वेश्यालयाच्या मालकिणीची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीच्या भूमिकेचं नाव ‘मल्लिकाजान’ असं होतं.

मनिषा सध्या ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ सीरिजच्या दुसऱ्या भागासाठी काम करत आहे. सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांना देखील सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;