आधी फ्लाइंग किस,मग फोटो; शाहरुख खानच्या लेकीचा रुमर्ड बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल; व्हिडीओनंतर फोटोची चर्चा

आधी फ्लाइंग किस,मग फोटो; शाहरुख खानच्या लेकीचा रुमर्ड बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल; व्हिडीओनंतर फोटोची चर्चा

अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना खानच्या एका फोटोची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. त्या फोटोवरून सुहाच्या डेटींगच्या चर्चा सुरु आहे. आधीही सुहानाच्या रुमर्ड बॉयफ्रेंडच्या चर्चा होत्या.

सुहाना खान तिच्या बॉलिवूडमधील पदार्पणामुळे चर्चेत आली. सुहाना चित्रपटापेक्षाही तिच्या रुमर्ड बॉयफ्रेंडवरून जास्त चर्चेत आहे. सुहाना खान हिचं नाव ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदासोबत जोडलं जात आहे.

सुहाना खान आणि अगस्त्य नंदा यांच्या अफेअरची चर्चा चागलीच रंगली आहे. सुहाना खानचा रुमर्ड बॉयफ्रेंड अगस्त्य नंदासोबत तिने ‘द आर्चीज’ चित्रपटात एकत्र काम केलं आहे. त्यानंतर यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.मात्र त्यानंतर अनेकदा त्यांना एकत्रही पाहिलं गेलं. पण त्या दोघांनीही याबद्दल कधीही मत मांडलं नाही.

फ्लाइंग किसहीचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान या दोघांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. ज्यामध्ये अगस्त्य सुहानाला कारपर्यंत सोडवायला जातो आणि त्यावेळी तिला तो जाताना बाय करत फ्लाइंग किसही देतो. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या दोघांच्या अफेरच्या चर्चा आणखी वेगाने पसरू लागल्या. त्याच्या अफेअरच्या चर्चेची पुष्टी करणारा एक फोटोही असाच व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेला व्हिडीओ ‘वरिंदर चावला’ नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ एका पार्टीनंतरचा असल्याचे दिसून आले ज्यामध्ये प्रत्येकजण आपापल्या घरी जाताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये अगस्त्य सुहानाची काळजी घेताना दिसत आहे. सुहानाला कारमध्ये बसवल्यानंतर अगस्त्याने तिला फ्लाइंग किस दिल्याचे दिसले.

व्हिडीओनंतर आता दोघांचा फोटो चर्चेत 

नुकताच अगस्त्य नंदाचा वाढदिवस होऊन गेला. सुहाना खानने तेव्हा अगस्त्य नंदाला वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या होत्या. सुहानाने सोशल मीडियावर अगस्त्य नंदासोबतचा एक फोटो शेअर केला होता, ज्यात ती त्याचे कान ओढताना दिसत आहे. हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना सुहानाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा” आणि एक मजेदार इमोजी देखील पोस्ट केला आहे.

सुहाना खान आणि अगस्त्य नंदा ‘द आर्चीज’ चित्रपटामध्ये एकत्र झळकले आहे. या चित्रपटात खुशी कपूर, युवराज मेंडा, वेदांग रैना, मिहिर आहुजा आणि आदिती सैगल हे ही मुख्य भूमिकेत दिसले. सुहाना खान लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. सुहाना खान शाहरुख खानसोबत ‘किंग’ या चित्रपटात दिसणार आहे.

‘द आर्चीज’ चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता, त्यामुळे थिएटरमध्ये रिलीज होणारा सुहानाचा हा पहिला चित्रपट असून ती वडिलांच्या चित्रपटातूनच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;