Chandrapur news – कोठारी वनपरिक्षेत्रात आढळला वाघिणीचा मृतदेह

Chandrapur news – कोठारी वनपरिक्षेत्रात आढळला वाघिणीचा मृतदेह

चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी वनपरिक्षेत्रात वाघिणीचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मृतक वाघ मादी असून तिचे वय सात ते आठ वर्ष असल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. तिच्या शरीरावर ओरखडल्याचेही निशाण आढळले आहेत. मृतक वाघिणीचे सर्व अवयव शाबूत आहेत.

प्रौढ नर वाघाने तिला ठार मारल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. पुढील तपास उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग श्वेता बोड्डू, सहाय्यक वनसंरक्षक शेंडगे यांचा मार्गदर्शनात वनपरीक्षेत्र अधिकारी एस. व्ही. मुरकुटे करीत आहेत. शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर वाघिणीच्या मृत्यूचे खरे कारण पुढे येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;