चार थरांचा केक,परिसारखा सुंदर ड्रेस, बॉलिवूड पार्टीपेक्षा कमी नव्हती राखीची बर्थडे पार्टी; दुबईत शानदार सेलिब्रेशन

चार थरांचा केक,परिसारखा सुंदर ड्रेस, बॉलिवूड पार्टीपेक्षा कमी नव्हती राखीची बर्थडे पार्टी; दुबईत शानदार सेलिब्रेशन

बॉलीवूडची ड्रामा क्वीन म्हटलं की राखी सावंत हे नाव पहिलं डोळ्यासमोर येत.  राखीही कायम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. या ड्रामा क्वीनचा काल (25 नोव्हेंबर 2024) रोजी वाढदिवस होता. राखीच्या वाढदिवसाचे दुबईमध्ये अगदी जंगी सेलिब्रेशन झालं. शिव ठाकरेपासून अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

दुबईत जंगी सेलिब्रेशन

सध्या राखी दुबईमध्ये आहे आणि तिथेच तिने मोठ्या दणक्यात आपला वाढदिवस साजरा केला आहे. ता राखी ४६ वर्षांची झाली आहे. सर्व चाहते आणि मित्रपरिवारासाठी राखीने जंगी पार्टीचे आयोजन केले होते. राखीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशचा व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये राखीने चार थरांचा मोठा केक कापला होता.

यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राखीच्या या बर्थडे पार्टीमध्ये ‘बिग बॉस’फेम शिव ठाकरे आणि अभिनेता विशाल कोटियनदेखील सहभागी झाला होता.

राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ पोस्ट आणि फोटो पोस्ट करत सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच तिने “माझ्या मित्र परिवारासह दुबईमध्ये वाढदिवसाचे सेलिब्रेशन, धन्यवाद संपूर्ण सृष्टी, धन्यवाद माझे मित्र, धन्यवाद आई…”, अश कॅप्शनही या पोस्टवर लिहिले आहे.

राखी म्हणजे फक्त एंटरटेंनमेंट एंटरटेंनमेंट

राखीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिचे आज बॉलीवूडमध्ये स्वत:चे असे वेगळे स्थान आहे. तिच्या डान्स आणि तिच्या मनोरंजन करण्याच्या स्टाईलचे सगळेच दिवाने आहेत. राखी म्हणजे फक्त एंटरटेंनमेंट एंटरटेंनमेंट असते. तिला मराठी- हिंदी बिग बॉसमध्ये तिच्या याच अदांमुळे आणि एंटरटेंनमेंटमुळे आवर्जून बोलवतात. त्यामुळे एंटरटेंनमेंट क्वीन असही तिला म्हटलं जातं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)


1997 मध्ये आलेल्या ‘अग्निचक्र’ या चित्रपटातून राखीने पहिल्यांदा चित्रपटात पाऊल ठेवलं. त्यानंतर राखीने अनेक रिअॅलिटी शो, चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. त्यामुळे आजही तिचे चाहत्यांमध्ये वाढच होताना दिसते.

राखीने अनेक आयटम साँग्सही केलेत. 2004 मध्ये आलेला ‘सातच्या आत घरात’ या मराठी चित्रपटातील ‘हिल पोरी हिला’ या गाण्याने राखी प्रसिद्धी झोतात आली. ‘परदेसीया’, ‘देखता है तू क्या’ या गाण्यांमुळे राखीच्या चाहत्यांमध्ये मोठी भर पडली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Fahad Asad (@fahadasad74)

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;