‘तोच माझं तोंड बंद करतो…’, लग्नाच्या 5 महिन्यांनंतर असं का म्हणाली सोनाक्षी सिन्हा?

‘तोच माझं तोंड बंद करतो…’, लग्नाच्या 5 महिन्यांनंतर असं का म्हणाली सोनाक्षी सिन्हा?

Sonakshi Sinha Marriage Life: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेता झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या लग्नाला 5 महिने झाले आहेत. दोघांचा आंतरधर्मीय विवाह तुफान चर्चेत राहिला. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सिन्हा कुटुंबाला ट्रोल केलं. पण दोघांनी नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करत फक्त आणि फक्त एकमेकांवर असलेल्या प्रेमाला महत्त्व दिलं. आता लग्नाच्या 5 महिन्यांनंतर सोनाक्षी हिने लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे.

सांगायचं झालं तर, विनोदवीर कपिल शर्मा याच्या ‘द ग्रेट इंडियन शो’ मध्ये सोनाक्षी सिन्हा, वडील शत्रुघ्न सिन्हा, आई पूनम सिन्हा आणि पकी झहीर इक्बाल याच्यासोबत पोहोचली होती. शो दरम्यान सोनाक्षीने अनेक गोष्टींचा विनोदी अंदाजात खुलासा केला…

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

 

सोनाक्षी तिच्या वडिलांना सांगते की, ‘तुम्ही तुमच्या जावयला अद्याप चांगल्या प्रकारे ओळखत नाही… तुमच्या मुलीचं कोणी तोंड बंद करु शकतो तर, तो फक्त झहीर आहे….’ यावर शत्रुघ्न सिन्हा म्हणतात, ‘असं असेल तर मुलगी योग्य ठिकाणी आहे…’ सोनाक्षीने केलेल्या वक्तव्यांवर झहीर देखील हसू लागतो…

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

 

दोघांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, मुस्लीम मुलासोबत लग्न केल्यामुळे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिला ट्रोल करण्यात आलं. तर अभिनेता आणि सोनाक्षीचा पती झहीर इक्बाल याच्यावर ‘लव्ह जिहाद’ सारखे आरोप करण्यात आले. पण दोघांनी कधीच होणाऱ्या ट्रोलिंगकडे लक्ष दिलं नाही.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचं लग्न…

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी 23 जून 2024 मध्ये लग्न केलं. जवळपास 7 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नानंतर सोनाक्षी कायम नवऱ्यासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;