सलमानच्या ऑनस्क्रीन बहिणीच्या वडिलांचं निधन; भावूक पोस्ट लिहित म्हणाली ‘मला माफ करा..’

सलमानच्या ऑनस्क्रीन बहिणीच्या वडिलांचं निधन; भावूक पोस्ट लिहित म्हणाली ‘मला माफ करा..’

‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात अभिनेता सलमान खानच्या ऑनस्क्रीन बहिणीची भूमिका साकारलेली आणि ‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये झळकलेली अभिनेत्री आशिका भाटियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आशिकाच्या वडिलांचं निधन झालं असून सोशल मीडियावरील पोस्टद्वारे तिने चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली. वडिलांसोबत लहानपणीचा फोटो पोस्ट करत आशिकाने दु:ख व्यक्त केलंय. या पोस्टमध्ये तिने तिच्या वडिलांची माफीसुद्धा मागितली आहे. वडिलांसोबतचा फोटो पोस्ट करत आशिकाने त्यावर लिहिलं, ‘मला माफ करा, मी तुमच्यावर खूप प्रेम करते. तुमच्या आत्म्याला शांती मिळो.’ आशिकाच्या वडिलांचं नाव राकेश भाटिया असून ते बिझनेसमन होते. त्यांच्या निधनामागील कारण अद्याप समोर आलं नाही.

वडिलांबद्दलची आशिकाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे. अनेकांनी तिच्यासाठी सहवेदना व्यक्त केल्या आहेत. तर अशा कठीण काळात स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घेण्याचं आवाहन तिच्या चाहत्यांनी केलंय. आशिका लहान असतानाच तिचे वडील राकेश भाटिया आणि आई मीनू भाटिया यांचा घटस्फोट झाला होता. आशिकाने तिच्या पायावरील सर्जरीनंतर कोणत्याच प्रोजेक्टमध्ये काम केलं नाही. मात्र सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असून तिचा मोठा चाहतावर्ग आहे. एका अपघातानंतर आशिकाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

आशिकाने ‘मीरा’ या मालिकेतून बालकलाकार म्हणून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने विविध मालिकांमध्ये काम केलं. यात ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’, ‘परवरिश’, ‘हम तुम’ यांचा समावेश आहे. ती सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटातही झळकली होती. यामध्ये तिने सलमानच्या छोट्या बहिणीची भूमिका साकारली होती. याशिवाय ती सलमानच्याच ‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. शोमध्ये तिची अभिषेक मल्हान, एल्विश यादव आणि मनिषा राणी यांच्यासोबत खूप चांगली मैत्री झाली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;