मोहम्मद शमीच्या पूर्व पत्नीचा बेडरुम व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले ‘याच कृत्यामुळे शमीने सोडलं..’

मोहम्मद शमीच्या पूर्व पत्नीचा बेडरुम व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले ‘याच कृत्यामुळे शमीने सोडलं..’

क्रिकेटर मोहम्मद शमीवर त्याची पूर्व पत्नी हसीन जहानने 2018 मध्ये मॅच फिक्सिंग आणि कौटुंबिक हिंसाचाराचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेऊन आपले मार्ग वेगळे केले. आता मोहम्मद शमीच्या पूर्व पत्नीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून नेटकरी तिला खूप ट्रोल करत आहेत. त्याचप्रमाणे शमीने तिला घटस्फोट देऊन योग्य निर्णय घेतल्याचं म्हणत आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये हसीन जहान पांढऱ्या ड्रेसमध्ये बेडरूममध्ये नाचत फिरताना दिसतेय. ऐश्वर्या रायच्या ‘कजरा रे’ या गाण्यावर तिने ही रील बनवली आहे. यात ती कधी खुर्चीवर बसते तर कधी सोफ्यावर झोपते आणि कधी बेडवर लोळतेय. हसीन जहानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मात्र यावरून नेटकरी तिच्यावर बरीच टीका करत आहेत.

मोहम्मद शमीने पत्नीला घटस्फोट देऊन खूप योग्य निर्णय घेतला’, असं एकाने लिहिलंय. तर ‘यात कृत्यामुळे शमी भाईने पत्नीला सोडलं’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘ही किती विचित्र आहे, मोहम्मद शमीने तिच्याशी लग्न करून आपल्या आयुष्यातील खूप चुकीचा निर्णय घेतला’, असं एका युजरने लिहिलं आहे. हसीन जहानने या व्हिडीओमध्ये तिचा बोल्ड अंदाजसुद्धा दाखवला आहे. त्यावरूनही नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Haseen Jahan (@hasinjahanofficial)

मोहम्मद शमीने 2014 मध्ये हसीन जहानशी लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षांतच दोघं विभक्त झाले. या दोघांना एक मुलगी आहे. कोलकाताच्या न्यायालयाने शमीला जानेवारी 2023 मध्ये हसीनला दर महिन्याला 1.30 लाख रुपये पोटगी म्हणून देण्याचे आदेश दिले होते. यात 50 हजार रुपये पूर्व पत्नीच्या खर्चासाठी आणि 80 हजार रुपये मुलीच्या संगोपनासाठी देण्याचे आदेश होते. एका कार्यक्रमात मोहम्मद शमीला त्याची मुलगी आयराबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावेळी तो भावूक झाला. “मी माझ्या मुलीला खूप मिस करतो. मी तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करतो. पण पत्नी हसीनाने अजूनपर्यंत मला तिला भेटू दिलेले नाही” असं शमी म्हणाला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;