प्रदूषणमुक्तीसाठी मुंबईत सर्व वॉर्डात रस्तेधुलाई! 1 डिसेंबरपासून वेगाने कार्यवाही

प्रदूषणमुक्तीसाठी मुंबईत सर्व वॉर्डात रस्तेधुलाई! 1 डिसेंबरपासून वेगाने कार्यवाही

मुंबईत रस्त्यावरील धुळीमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी रस्ते धुलाई सुरू करण्यात आली असून येत्या 1 डिसेंबरपासून सर्व वॉर्डांमध्ये ही कार्यवाही वेगाने करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत 35 टँकरच्या सहाय्याने पालिकेचा घन कचरा विभाग आणि पंत्राटदाराच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात येत आहे. पालिकेच्या अखत्यारीत असणाऱया 2 हजार किमी रस्त्यापैकी  दररोज किमान एक हजार किमी रस्ते धुण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे समजते.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या प्रदूषणाला बांधकामांमधून उडणारी धूळ, रस्त्यांवरील धूळ प्रमुख कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने हवेतील प्रदूषणाला कारणीभूत ठरणारी धूळ नियंत्रित करण्याच्या दृष्टीने उपाययोजनांना गती दिली आहे. यामध्ये गतवर्षीपासून पालिकेने मुंबईत ‘डीप क्लिनिंग’ मोहीम सुरू केली आहे. या वर्षीही नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच ही मोहीम पालिकेच्या स्तरावर सुरू करण्यात आली आहे.

पुनर्प्रक्रिया झालेल्या पाण्याचा वापर

रस्ते धुण्यासाठी पुनर्प्रक्रिया केलेल्या आणि स्थानिक स्रोतांमधील पाण्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची नासाडी होत नाही. मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी कमी वर्दळीच्या कालावधीमध्ये (ऑफ- पीक अवर्स) मध्ये विशेषतः पहाटे 3 ते सकाळी 6 दरम्यान रस्ते धुण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, तर काही विभागांमध्ये वर्दळ कमी असल्यास दुपारच्या अथवा सायंकाळच्या सत्रात हे काम केले जात आहे.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;