मोदी – अदानी भाई – भाई, देश बेचकर खाई मलाई! विरोधक आक्रमक,संसदेत गदारोळ

मोदी – अदानी भाई – भाई, देश बेचकर खाई मलाई! विरोधक आक्रमक,संसदेत गदारोळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाडके उद्योगमित्र गौतम अदानी यांच्यावर 2200 कोटींची लाच दिल्याचा ठपका अमेरिकेतील फेडरल कोर्टाने ठेवला आहे. त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंटही जारी करण्यात आला आहे. यावर चर्चेची मागणी करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात येताच ‘एक है तो सेफ है’ घोषणा देत विरोधकांनी सभाग़ृह दणाणून सोडले.  मोदी अदानींना वाचवत आहेत, असा आरोप विरोधकांनी करताच यातला एकही शब्द कामकाजात राहणार नाही, असे नमूद करत सभापतींनी चर्चेची मागणी धुडकावली व सभागृहाचे कामकाज बुधवारपर्यंत स्थगित केले. दरम्यान जंतर मंतरवर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी-अदानी भाई-भाई… देश बेचकर खाई मलाई’ अशा घोषणा देत संतप्त निदर्शने केली.

संसद बुधवारपर्यंत तहकूब

अदानी प्रकरणाचे तीव्र पडसाद संसदेच्या दोन्ही सभागृहांत उमटले. या प्रकरणी सरकारने तातडीने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधी खासदारांनी लोकसभेत केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी केलेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे कामकाज सुरुवातीला दुपारी बारा, त्यानंतर दुपारी दोन व नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;