अभ्युदय नगर पुनर्विकासाच्या निविदेला मुदतवाढ
अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या समूह पुनर्विकासासाठी विकासक नेमण्यासाठी म्हाडाने ऑक्टोबरला निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानुसार तांत्रिक बोली निविदा 22 नोव्हेंबर रोजी उघडण्यात येणार होती. मात्र आता या निविदेला दोन आठवडय़ांची मुदतवाढ दिल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.
अभ्युदय नगर, काळाचौकी वसाहतीत 48 इमारती असून 208 चौरस फूटांच्या 3410 सदनिका आहेत. पुनर्वसन सदनिकेचे चटई क्षेत्रफळ किमान 635 चौरस फूट असावे, प्रत्येकाला पार्ंकग असावी, पाच लाख रुपये कॉर्पस फंड एकदाच द्यावा, प्रकल्प पूर्ण होईपर्यंत दरमहा सदनिकाधारकाला वीस हजार रुपये भाडे द्यावे अशा अटी या निविदेत समाविष्ट आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List