रश्मी शुक्ला पुन्हा राज्याच्या पोलीस महासंचालक
राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उद्या सकाळी त्या पदभार स्वीकारणार आहेत.
काँग्रेससह विरोधी पक्षांनी सातत्याने मागणी केल्यानंतर रश्मी शुक्ला यांना निवडणुकीच्या काळात पदावरून हटवण्यात आले होते. त्या सक्तीच्या रजेवर होत्या. दरम्यान, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याने व आचारसंहिता समाप्त झाल्याने लगेचच शुक्ला यांच्या सक्तीच्या रजेचा कालावधी संपुष्टात आणला गेला आहे. त्यांनी संजयकुमार वर्मा यांच्याकडून पोलीस महासंचालक व महानिरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List