महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची सलामी

महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची सलामी

43व्या कुमार व मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी दमदार विजयासह सलामी दिली. उत्तर प्रदेशातील अलिगढ येथील महाराणी अहिल्याबाई होळकर स्पोर्ट्स स्टेडियमवर सुरू झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत कुमार व मुली गटांमध्ये प्रत्येकी 30 संघांनी सहभाग घेतला आहे.

आज स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र मुलांच्या संघाने सलामीच्या सामन्यात विदर्भावर 37-26 असा 11 गुण आणि 5 मिनिटे राखून दणदणीत विजय मिळवला. मुलींच्या गटात महाराष्ट्राने मध्य प्रदेशवर 40-12 असा 1 डाव आणि 28 गुणांनी धुव्वा उडवला.

मुलींच्या सामन्यात प्रतीक्षा बिराजदारने 3.30 मी. संरक्षण करून आक्रमणात 2 गुण मिळवले. अश्विनी शिंदे हिनेही 3.30 मी. संरक्षण करून 4 गुणांची कमाई केली. सुषमा चौधरीने 3.20 मी. संरक्षण करून आक्रमणामध्ये 4 गडी बाद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;