वैष्णोदेवी रोपवे प्रकल्पाविरोधात आंदोलन
जम्मू-कश्मीरमधील कटरा येथील वैष्णोदेवी रोपवे प्रकल्पाविरोधात आज स्थानिक दुकानदार आणि मजुरांनी सलग चौथ्या दिवशी आंदोलन केले. आंदोलकांनी श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता दोघांमध्ये हाणामारी झाली. या चकमकीत एक पोलीस जखमी झाला. आंदोलकांनी सुरुवातीला दंडाधिकारी कार्यालयाबाहेर निषेध रॅली काढली. त्यानंतर शालिमार पार्कबाहेर आंदोलन करण्यात आले. दरम्यान वैष्णोदेवी दर्शनासाठी जाणाऱया लोकांसाठी शालिमार पार्कमध्येच बेस पॅम्प तयार करण्यात आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List