अखेर मलायका अरोराने तिचे ‘रिलेशनशिप स्टेटस’ सांगितले; उत्तराने मात्र सगळेच गोंधळले

अखेर मलायका अरोराने तिचे ‘रिलेशनशिप स्टेटस’ सांगितले; उत्तराने मात्र सगळेच गोंधळले

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपच्या चर्चा अद्यापपर्यंत सुरुच आहे. दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले असले तरीही त्यांच्या नात्याबद्दल आणि ब्रेकअपबद्दलच्या चर्चा मात्र थांबलेल्या नाहीयेत. दोघांनीही जवळपास 6 वर्षे एकमेकांना डेट केलं. अर्जुनने स्वतः त्यांच्या ब्रेकअप झाल्याचे कबुल केले होते. मात्र त्यानंतर त्या दोघांच्याही सोशल मीडियावर काहीना काही पोस्ट करणं सुरुच असतं. त्यात अर्जूनपेक्षाही मलायाका तिच्या सोशल मीडियावर काहीना काही पोस्ट करत असते. आताही तिने अशीच एक पोस्ट केली आहे ती बरीच चर्चेत आली आहे.

 मलायकाचे ‘रिलेशनशिप स्टेटस’

सोशल मीडियावर मलायका नेहमीच अॅक्टीव असते. ती तिच्या आयुष्य़ाबद्दल तिच्या चाहत्यांसाठी काहीना काही शेअक करत असते. आताही तिने अशीच एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने सध्याचे तिचे रिलेशनशिप स्टेटस काय आहे त्याबद्दल सांगितले आहे. मलायकाची ही पोस्ट प्रचंड चर्चेत आली आहे.

एका कार्यक्रमादरम्यान अर्जुन कपूरने तो केले की तो सिंगल असल्याचे सांगितले होते. अर्जुनच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या नात्याला खरोखरच पूर्णविराम मिळाला हे सिद्ध झालं. मात्र त्यावेळी मलायका अरोराकडून यावर कोणतेही वक्तव्य आले नव्हते. पण आता मलायकाकडून तिच्या रिलेशनशिप स्टेटसवर एक पोस्ट करण्यात आली आहे. ज्यामुळे तिचे चाहतेही गोंधळून गेले आहेत.

मलायकाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये लिहिले आहे, “या क्षणी माझी स्थिती.” यामध्ये खाली तीन पर्याय दिले आहेत, जे असे आहेत, “इन रिलेशनशिप, सिंगल आणि हिहीही.” (हीहीही म्हणजे हसण्याचे चिन्ह) त्यावेळी तिने शेवटचा पर्याय निवडला आहे ज्यामध्ये मलायकाने हसण्याचा चे चिन्ह आहे. तो पर्याय तिने हायलाइट केला आहे.. म्हणजे त्यावर तिने टिक केली आहे. पण मलायकाच्या या स्टेटसच्या पोस्टमुळे नक्की तिला काय सांगायचे आहे हे मात्र चाहत्यांना समजू शकलेलं नाही. त्यामुळे नक्कीच तेही गोंधळून गेले आहेत.

अर्जुनेच ब्रेकअपबद्दल केला होता खुलासा 

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यातील नातं संपुष्टात आल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. मात्र दोघांनीही याबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. गेल्या महिन्यात सिंघम अगेनच्या प्रमोशनदरम्यान या चित्रपटातील स्टार्सनी एका दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती. यादरम्यान अर्जुनसमोर मलायकाच्या नावाच्या घोषणा दिल्या जाऊ लागल्या. त्यानंतर पापाराझींशी बोलताना अर्जुन कपूर म्हणाला , “मी आता सिंगल आहे, आराम करा”.

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;