स्पीडचे भान नाही,सिग्नलही मोडला; मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याला अटक

स्पीडचे भान नाही,सिग्नलही मोडला; मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याला अटक

कित्येकदा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याप्रकरणी किंवा हीट अॅंड रनच्या प्रकरणी अनेकदा बऱ्याच कलाकारांना पोलिसांनी अटक केल्याच्या बातम्या आपण ऐकल्या आणि पाहिल्या आहेत. आतापर्यंत शक्यतो हे अशआ प्रकराच्या बातम्या या बॉलिवूडमधूनच आलेल्या पाहिल्या असतील. पण आता दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्यानेही असंच काहीसं केलं आहे. ; मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे.

फक्त मल्याळम इंडस्ट्रीतच नव्हे तर भारतभर प्रचंड गाजणारा चित्रपट म्हणजे ‘मंजुम्मेल बॉईज’. या चित्रपटाबद्दल तसं ऐकलं असेलच. याच चित्रपटातील अभिनेता गणपती याला मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्यामुळे पोलिसांनी अटक केली आहे.

मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता 

रविवारी (24 नोव्हेंबर2024) पोलिसांनी त्याच्याविरुद्ध मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे आणि सिग्नलचे उल्लंघन करणे या संदर्भात गुन्हा नोंदवला आहे,. गणपती अंगलामळीहून कलमस्सेरीकडे जात असताना पोलिसांनी त्याला पकडले असल्याची माहिती आहे. अंगलामळी आणि कलमस्सेरीदरम्यानच्या महामार्गावर गणपती वेगाने गाडी चालवत होता.

पोलिसांनी त्याला अठानी आणि आलुवा येथे थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो गाडी चालवत पुढे निघून गेला. शेवटी पोलिसांनी त्याला कलमस्सेरी येथे त्याला अडवले. त्याची अल्कोहोल टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली. पोलिसांनी सांगितले अभिनेता हा अत्यंत वेगाने गाडी चालवत होता. अटक झाल्यानंतर काही तासांनी त्याला जामिनावर सोडण्यातही आले.

‘मंजुमल बॉईज’ प्रचंड गाजलेला सिनेमा

गणपती हा एक प्रसिद्ध मल्याळम अभिनेता आहे. पण त्याने हिंदी चित्रपटातही काम केलं आहे. ‘द वेटिंग रूम’या चित्रपटात त्याने काम करून, हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तसेच त्याने तो जीतू जोसेफ दिग्दर्शित ‘मिस्टर ॲण्ड मिसेस राऊडी’ या चित्रपटातही काम केले आहे. मात्र त्याचा जास्त चर्चेत राहलेला सिनेमा म्हणजे ‘मंजुमल बॉईज’. कारण हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे.

हा सिनेमा पाहून दिग्दर्शक अनुराग कश्यपने सिनेमाचं कौतुक करत ‘बॉलिवूड अजून खुप मागे आहे’, असं मोठं विधानही केलं होतं. ‘मंजुमल बॉईज’ हा मल्याळम इंडस्ट्रीतला पहिला सिनेमा आहे ज्याने 200 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला होता. मात्र पोलिसांनी केलेल्या या अटकेमुळे तो चर्चेत आला आहे. या प्रकणावर त्याने अद्याप तरी कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;