“तिचे आभार मानतो, मला व्यक्त होता येत नाही…”;घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक पहिल्यांदाच ऐश्वर्याबद्दल भावनिक

“तिचे आभार मानतो, मला व्यक्त होता येत नाही…”;घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक पहिल्यांदाच ऐश्वर्याबद्दल भावनिक

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्पोटाच्या चर्चा या अद्यापपर्यंत सुरुच आहेत. कोणत्याना कोणत्या कारणाने त्या वाढतच आहे. पण यावर अभिषेक किंवा ऐश्वर्या म्हणावं तशी प्रतिक्रिया देताना दिसत नाही. किंवा त्यांच्या घटस्फोटावरील चर्चांवर कोणतीच ठोस प्रतिक्रिया देताना दिसत नाही. पण एका मुलाखती दरम्यान मात्र अभिषेकने ऐश्वर्याबद्दल नक्कीच त्याचं मत व्यक्त केलं आहे.

अभिषेकचा‘आय वॉन्ट टू टॉक’ चित्रपट रिलीज झाला आहे. चित्रपचटाला चांगल्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. मात्र चित्रपटाचे कलेक्शन खूपच निराशाजनक आहे. या चित्रपटात एक आजारी बाबा व त्याच्या मुलीच्या गुंतागुंतीच्या नात्याची कथा मांडण्यात आली आहे. चित्रपटासंदर्भात एका मुलाखतीदरम्यान अभिषेकला आराध्य तसेच ऐश्वर्याबद्दल विचारलं असता त्याने आराध्याबरोबरच्या नात्याबद्दल खुलासा केला. तसेच पत्नी ऐश्वर्या राय बच्चनचे आभारही मानले.

संगोपनाबद्दल आईचे कौतुक
मुलाखती दरम्यान बोलताना अभिषेकने सांगितले की लहानपणी त्याला कधीही एकटं वाटलं नाही. त्याचं सगळं श्रेय त्याची आई जया बच्चन यांना जातं. मुलांचे संगोपन करण्यासाठी जया बच्चन यांनी अभिनयातून ब्रेक घेतला होता. अभिषेक म्हणाला की, “माझ्या जन्मानंतर माझ्या आईने अभिनयातून ब्रेक घेतला, कारण तिला मुलांसोबत वेळ घालवायचा होता. बाबा आजूबाजूला नसल्याचं आम्हाला कधीच जाणवलं नाही,”. असं म्हणत त्याने आईचं कौतुक केलं आहे.

 

अभिषेकने मानले पत्नीचे आभार 

आईनंतर अभिषेकने पत्नीचेही कौतुक केले आहे. ‘आय वॉन्ट टू टॉक’चे दिग्दर्शक शूजित सरका

र यांनी जया बच्चन यांनी मुलांसाठी केलेल्या त्यागाचे कौतुक केल त्याचवेळी अभिषेकने त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चनचाही आवर्जून उल्लेख केला. तो म्हणाला की, “मी नशीबवान आहे की मला बाहेर जाऊन चित्रपट करायला मिळतात; कारण मला माहीत आहे की ऐश्वर्या आराध्यासोबत घरी आहे आणि त्याबद्दल मी तिचे मनापासून आभार मानतो,” असं म्हणत त्याने पत्नीच्या त्यागाचाही उल्लेख करत तिचे कौतुक केले आहे.

“आई-बाबा झाल्यावर तुमची मुलं…” अभिषेकची वडील म्हणून भावनिक प्रतिक्रिया

तसेच पुढे तो म्हणाला “आई-बाबा झाल्यावर तुमची मुलं तुम्हाला खूप प्रेरणा देतात. गरज असेल तर तुम्ही तुमच्या मुलासाठी एका पायावर पर्वतही चढू शकता. खासकरून सर्व माता व महिलांबद्दल मी आदराने बोलतोय. कारण त्या जे करतात ते कोणीच करू शकत नाही. पण एक बाबा या सगळ्या गोष्टी शांतपणे करतो कारण त्याला व्यक्त कसं व्हावं ते समजत नाही. वाढत्या वयानुसार मुलांना कळते की त्यांचे वडील किती मजबूत आहेत. ते कदाचित बॅकग्राउंडमध्ये असतील पण ते नेहमी आपल्या पाठी असतातच,” असही अभिषेक म्हणाला.

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक पहिल्यांदाच ऐश्वर्याबद्दल असं काही म्हणाल्याने,तिचे आवर्जून कौतुक केल्याबद्दल या सर्व चर्चा फोल ठरून यांच्यात पुन्हा सर्व अलबेल सुरु असल्याच्या चर्चा रंगू लागतील असं दिसत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;