‘कांतारा’ चित्रपटातील कलाकारांच्या जीवावर बेतणारा भीषण अपघात; शूटींगहून परतत असताना कलाकारांची बस उलटली

‘कांतारा’ चित्रपटातील कलाकारांच्या जीवावर बेतणारा भीषण अपघात; शूटींगहून परतत असताना कलाकारांची बस उलटली

‘कांतारा’ चित्रपटाच्या पुढील भागाचे शुटींग सुरू असताना कलाकारांवर मोठं संकट ओढावलं आहे. या कलाकारांच्या जीवावर बेतेल असा भीषण अपघात झाला आहे. कर्नाटकात सध्या ‘कांतारा चॅप्टर 1’सिनेमाचं शूटींग सुरु होतं. शूटींगच्या सेटवरुन परतणाऱ्या कलाकारांच्या बसला भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. कलाकार ज्या बसने प्रवास करत होते ती बसच उलटल्याची माहिती मिळत आहे.

सध्या या अपघातामध्ये जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची अधिक तपासणी केली जातेय. कलाकारांच्या संपूर्ण टीमच्या बसलाच हा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेमध्ये अनेक ज्युनियर कलाकारांना दुखापत झाली आहे. तसेच एक ज्युनिअर कलाकार गंभीर जखमी असल्याचंही सांगितलं जातंय.

मिनी बस उलटली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री चित्रपटाच्या टीमला घेऊन जाणारी मिनी बस उलटली. जडकलमधील मुदूर येथे शूटिंग पूर्ण करून ते कोल्लूरला परतत असताना ही घटना घडल्याचे असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. मिनी बसमध्ये 20 कलाकार होते. या घटनेनंतर जखमींना जडकल आणि कुंदापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे. कोल्लूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

या दुर्घटनेबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. मात्र जखमी अभिनेत्यांच्या उपचाराची जबाबदारी प्रॉडक्शन हाऊस घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

कांताराची रिलीज डेट पुढे ढकलणार ?

‘कंतारा’ 2022 साली रिलीज झाला होता. हा सिनेमा प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून घेतला होता. अवघ्या 16 कोटींमध्ये तयार झालेल्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 207 कोटी रुपयांचा गल्ला जमावला होता. सिनेमॅटोग्राफी, उत्तम दिग्दर्शन आणि कथानक या गोष्टींमुळे हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. हा आता या सिनेमाचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘कांतारा चॅप्टर 1’ असं या सिनेमाचं नाव असून हा सिनेमा ऑक्टोबर 2025 रोजी रिलीज होणार आहे.

मात्र आता या दूर्घटनेनंतर चित्रपटाच्या चित्रिकरणापासून पुढील सर्व गोष्टी लांबणीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान अपघातात जखमी झालेले कलाकार हे लवकर बरे व्हावे असचं सर्वांची प्रार्थना आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;