दिल्ली सरकारने वृद्धांसाठी सुरू केली पेन्शन योजना, 24 तासांत दहा हजार अर्ज दाखल

दिल्ली सरकारने वृद्धांसाठी सुरू केली पेन्शन योजना, 24 तासांत दहा हजार अर्ज दाखल

दिल्लीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी दिल्ली सरकारने मोठी घोषणा केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी सरकारने वृद्धांना पेन्शन देण्याची घोषणा केली आहे. दिल्ली सरकार 80 हजार वृद्धांसाठी नवीन वृद्धापकाळ पेन्शन सुरू करणार आहे. त्यामुळे दिल्लीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही महत्त्वाची घोषणा आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पेन्शनची घोषणा केली आहे. ‘आमच्या सरकारमध्ये 1 .25 लाख नागरिकांनी या पेन्शन फायदा झाला आहे. तर आता या संख्येत वाढ होऊन एकूण 5 लाख 30 हजार वृद्धांना ही पेन्शन मिळणार आहे. दरम्यान या योजनेची घोषणा केल्यापासून गेल्य़ा 24 तासांत दहा हजार अर्ज आले आहेत. आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी गेलो तेथे मला लोक वृद्धांसाठी पेन्शन योजनेची मागणी करायचे. आता त्याचीच अंमलबजावणी दिल्ली सरकारने केली आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे.

कोणाला व किती मिळणार वृद्धापकाळ निवृत्ती पेन्शन?
1. 60 ते 69 वयोगटातील व्यक्तीला दरमहा दोन हजार रुपये दिले जातील.
2. 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृद्ध व्यक्तीला दरमहा अडीच हजार रुपये दिले जातील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;