शरिरात युरिक ॲसिडचं प्रमाण वाढलय? ‘या’ पदार्थाचा आहारात करा समावेश

शरिरात युरिक ॲसिडचं प्रमाण वाढलय? ‘या’ पदार्थाचा आहारात करा समावेश

खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे युरिक ॲसिडची समस्या सामान्य झाली आहे. जेव्हा शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते तेव्हा संधिवात, किडनी स्टोनसह अनेक आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे जर शरिरातील युरिक ॲसिडचे प्रणाम नियंत्रीत ठेवायचे असेल तर आहारात घरगुती पदार्थांचा वापर करणे आवश्यक आहे. कोणता पदार्थाचे सेवन केल्यास शरीरातून युरिक ॲसिड निघून जाईल हे आपण जाणून घेऊया.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते हिरव्या चटणीचा वापर दररोजच्या आहारात केल्यामुळे शरीरातून युरिक ॲसिडचे प्रमाण कमी होते. ही चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर, पुदिना, लसूण, आले, लिंबू आणि काही खास मसाले वापरतात. धणे आणि पुदिन्यामध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे लघवीद्वारे यूरिक ऍसिड काढून टाकण्यास मदत होते. या व्यतिरिक्त या चटणीमध्ये लिंबू आणि आल्याचा वापर केल्यास किडनी डिटॉक्स करण्यास मदत होईल.

लसूण आणि आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे यूरिक ऍसिडमुळे शरीरातील सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. या चटणीमध्ये वापरण्यात आलेले मसाले पचनक्रिया मजबूत करतात आणि यामुळे पोटही साफ होते. त्यामुळे या चटणीचा वापर आहारात करणे गरजेचे आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;