टेटवलीत घराला आग ; शिवसेना जिल्हा प्रमुख संजय कदम घटनास्थळी मदतीला धावले

टेटवलीत घराला आग ; शिवसेना जिल्हा प्रमुख संजय कदम घटनास्थळी मदतीला धावले

टेटवली येथील देऊ भडवळकर यांचे घराला आग लागल्याचे वृत्त सगळीकडे पसरताच याची कुणकुण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय कदम यांना लागताच त्यांनी धाव घेत आपदग्रस्ताला मदतीचा हात दिला.

दापोली तालुक्यातील टेटवली येथील देऊ रामजी भडवळकर याचे घराला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी टळली असली तरी भडवळकर यांचे खुपच मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच माजी आम. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय कदम यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीची माहिती घेत आपदग्रस्ताला धीर देत आपल्या परीने मदतीचा हात दिला. तसेच प्रशासनाला सांगून तात्काळ भडवळकर यांना मदत मिळावी यासाठी पंचनामा करण्याची नुसतीच सूचना केली नाही तर पंचनामा होईतोवर ते थांबून राहिले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय कदम यांचे समवेत टेटवली ग्रामपंचायत सरपंच मेहबूब अयुब टेटवलकर,पोलीस पाटील अतिश भागवत ,तलाठी साहिल शिंदे, फुरुस शिवसेना विभाग प्रमुख दत्ता भिलारे आदींसह ग्रामस्थ स्थानिक ग्रामस्थ उपस्थितीत उपस्थित होते

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;