दोन प्रसिद्ध अभिनेत्रींचा एक सुखद योगायोग…; रसिका आणि ऐश्वर्या पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

दोन प्रसिद्ध अभिनेत्रींचा एक सुखद योगायोग…; रसिका आणि ऐश्वर्या पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

‘कलर्स मराठी’वर आजपासून मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेते अशोक सराफ यांची ‘अशोक मा.मा.’ आणि ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दोन्ही मालिका वेगळ्या धाटणीच्या असूनही या मालिकांची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या मालिकांची एक खास गोष्ट म्हणजे या दोन्ही मालिकेत ‘कलर्स मराठी’च्या माध्यमातून छोटा पडदा व्यापून टाकणाऱ्या रसिका वाखारकर आणि ऐश्वर्या शेटे या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या दोन्ही अभिनेत्रींच्या याआधी ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ आणि ‘रमा राघव’ या मालिका एकत्रच सुरू झाल्या होत्या. या दोन्ही मालिका चांगल्याच गाजल्या.

दोघींची नव्या प्रवासाला सुरुवात

आता पुन्हा एकदा रसिकाची ‘अशोक मा.मा.’ आणि ऐश्वर्याची ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिका एकत्रच सुरू होत आहेत. हा नक्कीच एक सुखद योगायोग आहे. आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला दोन्ही अभिनेत्री सज्ज आहेत. ‘पिंगा गं पोरी पिंगा’ ही मालिका प्रेक्षकांना आजपासून संध्याकाळी 7:30 वाजता पाहायला मिळणार आहे. तर ‘अशोक मा.मा.’ ही मालिका प्रेक्षकांना रात्री 8:30 वाजता ‘कलर्स मराठी’वर पाहायला मिळणार आहे.

रसिका काय म्हणाली?

रसिका वाखारकर हिने तिच्या या नव्या मालिकेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ऐश्वर्या आणि माझी ‘कलर्स मराठी’वर याआधी ‘रमा राघव’ आणि ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिका एकाचदिवशी सुरू झाल्या होत्या. आता दुसरी मालिकासुद्धा एकाचदिवशी सुरू होणार आहे हा खरोखरच एक कमालीचा योगायोग आहे. आणखी एक भारी गोष्ट म्हणजे अगदी विरुद्ध स्वभावाचे पात्र आम्ही या दुसऱ्या मालिकेत साकारणार आहोत, असं रसिका म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ऐश्वर्या शेटेची नवी मालिका

ऐश्वर्या शेटे हिने देखील तिच्या भूमिकेबद्दल माहिती दिली आहे. रसिका माझी खूप जवळची मैत्रिण आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आम्ही भेटलोच होतो ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ आणि ‘रमा राघव’ या मालिकांच्या प्रमोशनच्यावेळी. तेव्हा आमची छान मैत्री झाली. तेव्हाही आमच्या दोन्ही मालिका एकत्र लाँच झाल्या होत्या. आता योगायोगाने पुन्हा तेच होतंय. ‘अशोक मा.मा.’ आणि माझी ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या दोन्ही मालिका एकत्र सुरू होत आहेत. कदाचीत आम्ही दोघी एकमेकींसाठी खूप लकी आहोत, असं ती म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;