‘अप्पी आमची कलेक्टर’ची कथा अत्यंत भावनिक वळणावर; प्रेक्षकांनाही अश्रू अनावर!
झी मराठी वाहिनीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेचं कथानक अत्यंत भावनिक टप्प्यावर येऊन पोहोचलं आहे. या मालिकेत अमोलची कॅन्सरशी झुंज सुरू आहे. अमोलचा आजार तिसऱ्या स्टेजला पोहोचला आहे, त्यामुळे सर्वांना त्याच्या प्रकृतीची चिंता आहे.
अमोल म्हणतो, "तुम्ही रडलात तर मी लवकर जाईन. इथून पुढे प्रत्येक दिवस मी एका वर्षासारखा जगणार आहे." अमोल इतक्या भयानक आजाराशी सामना करतोय हे बघताना प्रत्येक दिवस अप्पी आणि अर्जुनसाठी कठीण जात आहे.
अमोलच्या सांगण्यावरून सगळ्यांनी दिवाळी एकत्रित साजरी केली. घरी कोणालाच कामावर जायची इच्छा नाही, पण अमोल एकेकाला छडी घेऊन हाकलतो. कामाच्या ठिकाणी कुणाचंच मन लागत नाही.
दिवसा अप्पी तर अर्जुन नाईट ड्यूटी घेतो. अमोलला घरच्या सगळ्यांचं दुःख कळतंय. तो ठरवतो की जाण्याआधी मी सगळ्यांचं आयुष्य सुखी करून जाणार.
आता केमोथेरपीचा सामना करत असताना अमोलची त्याच्या आजाराशी लढाई अधिक तीव्र होत जाणार आहे. परंतु तो प्रत्येक दिवस पूर्णपणे जगण्याचा दृढनिश्चय करतोय.
केमोथेरपीमुळे अमोलचे केस काढले जातात त्यामुळे घरच्या सगळ्यांना वाईट वाटतंय. घरचे सगळेच पुरुष त्याच्यासोबत केस काढायला बसतात पण अमोल त्यांना थांबवतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.







Comment List