‘सर्वांना माहितीये..’; अफेअरच्या चर्चांदरम्यान रश्मिकाने लग्नाबद्दल दिली मोठी हिंट

‘सर्वांना माहितीये..’; अफेअरच्या चर्चांदरम्यान रश्मिकाने लग्नाबद्दल दिली मोठी हिंट

‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत असते. रश्मिकाचं नाव अनेकदा दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाशी जोडलं गेलंय. मात्र त्यावर दोघांनी कधी प्रतिक्रिया दिली नाही. या चर्चांदरम्यान रश्मिका आणि विजयचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या फोटोमध्ये दोघं एकाच रंगसंगतीच्या कपड्यांमध्ये एखाद्या कपलप्रमाणे एकत्र लंच करताना दिसले. काही दिवसांपूर्वी विजयने रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर आता रश्मिकाने नुकत्याच एका कार्यक्रमात तिच्या लग्नाच्या प्लॅनिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटातील ‘किसिक’ या गाण्याच्या लाँचदरम्यान भर कार्यक्रमात रश्मिकाला लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

चेन्नईमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला असंख्य चाहच्यांनी गर्दी केली होती. रश्मिका मंचावर येताच सर्वांनी तिच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर सूत्रसंचालकाने रश्मिकाला तिच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारले. “तुला लग्न करण्यासाठी फिल्म इंडस्ट्रीतील मुलगा हवा की नको”, असा प्रश्न तिला विचारला असता रश्मिका जोरात हसली. त्यानंतर ती म्हणाली, “प्रत्येकाला त्याबद्दल माहित आहे.” यावेळी तिने विजयचं थेट नाव घेतलं नाही, पण तिचा इशारा त्याकडेच असल्याचा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत.

रश्मिकाला पुन्हा तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. “तू फिल्म इंडस्ट्रीतील कोणाशी लग्न करशील की तुझा होणारा पती या इंडस्ट्रीबाहेरचा असेल? तू जर आम्हाला स्पष्ट उत्तर दिलंस, तर आम्ही तुझ्यासाठी तसा मुलगा शोधू”, असं तिला विचारलं गेलं. यावर रश्मिकाने दिलेलं उत्तर ऐकताच अल्लू अर्जुनसह उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. “मला माहितीये की तुम्हाला नेमकं काय उत्तर हवंय. मला पूर्णपणे माहित आहे. पण सध्या त्या विषयात नको पडुयात, मी तुम्हाला नंतर खासगीत याबद्दल सांगेन”, असं रश्मिका म्हणते.

याआधी दिलेल्या एका मुलाखतीत विजय म्हणाला होता, “मी याआधी सहअभिनेत्रीला डेट केलंय. मी आता 35 वर्षांचा आहे आणि आतापर्यंत मी सिंगल असेन का? सर्वांना कधी ना कधी लग्न करायचंच असतं. एखाद्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला तर ती वेगळी गोष्ट आहे.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;