विराट – अनुष्काच्या मुलाचा पहिल्यांदा दिसला चेहरा? ‘त्या’ व्हायरल फोटो मागचं सत्य अखेर काय

विराट – अनुष्काच्या मुलाचा पहिल्यांदा दिसला चेहरा? ‘त्या’ व्हायरल फोटो मागचं सत्य अखेर काय

Virat Kohli and Anushka Sharma son: अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता देखील विराट – अनुष्का एका फोटोमुळे चर्चेत आले आहे. दरम्यान, पती विराट कोहली याला चिअर करण्यासाठी पर्थ येथे सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 साठी अनुष्का पोहोचली. स्टेडियमवरील अनुष्काचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पण अनुष्कासोबतच आणखी एक फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर अनुष्का हिच्यासोबत एका चिमुकल्याचा फोटो देखील व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर ज्या चिमुकल्याचा फोटो व्हायरल होत तो विराट – अनुष्का यांचा मुलगा आकाय कोहली… असल्याची चर्चा रंगली आहे. कारण फोटोमध्ये अनुष्कासारखी कोणीतरी बाजूला बसली आहे… असं देखील सांगण्यात येत आहे…

 

फोटो अनुष्का – विराट यांनी पोस्ट केलेला नाही. पण व्हायरल होत असलेल्या फोटोवर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘अकाय कोहलीच आहे का?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘विराट कोहलीची कार्बन कॉपी…’ असं म्हणाला आहे. पण व्हायरल होत असलेला फोटो अकाय कोहली याचा आहे… यावर अधिकृत माहिती मिळालेली नाही.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांना लग्न करण्याचा निर्णय घेतला. विराट – अनुष्का यांनी 2018 मध्ये खास पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं. लग्नानंतर 2021 मध्ये अनुष्का हिने 11 जानेवारी 2021 मध्ये लेक वामिका हिला जन्म दिला. त्यानंतर 15 फेब्रुवारी 2024 मध्ये अनुष्काने दुसरं बाळ अकाय कोहली याला जन्म दिला.

मुलांसाठी विराट – अनुष्का यांनी ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवली आहे. अनुष्का मुलांसोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पण अभिनेत्रीने अद्याप वामिका आणि अकाय यांचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. शिवाय अभिनेत्री अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. अनुष्का बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;